लोकमत न्यूज नेटवर्क
ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओतूर येथील उपबाजारात रविवारी १७ हजार २३४ कांदा पिशव्यांंची आवक झाली. प्रतवारीनुसार १० किलोस १७५ रुपये ते १७५ बाजारभाव मिळाला. गुरूवारपेक्षा कांद्याच्या भावात ११६ रूपयांची मोठी घसरण नोंदवली गेली, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
ओतूर येथील बाजारात गेल्या. काही आठवड्यापासून कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या. गुरूवारच्या तुलनेत रविवारी ११६ रूपयांनी कांद्याच्या भावात घरसण झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रतवारीनुसार १० किलोस मिळालेले बाजारभाव: कांदा नं १ (गोळा) १७५ ते २३५ रुपये. कांदा नं २- १२५ ते १७५ रुपये. कांदा नं. ३ (गोल्टा) ७५ ते १२५ रुपये. कांदा नं ४ (बदला) ५१ ते १०० रुपये.
बटाटा बाजार :
रविवारी फक्त ५४ बटाटा पिशव्यांंची आवक होऊन प्रतवारीनुसार १० किलोस १०० ते ३७१ रुपये बाजारभाव मिळाला. आवक कमी असल्याने बाजारभावात थोडी वाढ झाली आहे, अशी माहिती ओतूर मार्केट चे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.