मंचर : आवक कमी झाल्याने कांद्याच्या बाजारभावात काहीशी वाढ झाली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी १० किलोस १२० ते २०० रुपये असा बाजारभाव कांद्याला मिळाला आहे. मागील लिलावापेक्षा बाजारभावात २० टक्के वाढ झाली आहे.मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी साडेतीन हजार पिशवी कांद्याची आवक झाली. दुपारी लिलावाला सुरुवात झाली. तेव्हा कांद्याच्या बाजारभावात काहीशी वाढ झाली. १० किलोस १२० ते २०० रुपये असा बाजारभाव कांद्याला मिळाला आहे. बदला कांदा ७० रुपये, तर गुलटी कांदा १०० रुपये या भावाने विकला गेला आहे. रविवारी कांदा सर्वाधिक १८० रुपये या भावाने विकला गेला होता. आजच्या लिलावात २० टक्के भाववाढझाली आहे.सध्या जुना कांदा विक्रीसाठी येत आहे. नवीन कांद्याची आवक सुरू झाली नसल्याची माहिती बाजार समितीचे सचिव गणेश गावडे यांनी दिली. शेतकºयांनी बराखीत कांदा साठवून ठेवला आहे. तो टप्प्याटप्याने विक्रीसाठी आणला जात आहे.महिन्यापूर्वी कांद्याला उच्चांकी ३२० रुपये भाव मिळाला होता. मात्र, नंतर कांद्याचे बाजारभाव कमी होत चालले होते. पंधरा दिवसांपूर्वी बाजारभाव १० किलोस १५० पर्यंत आले होते.त्यानंतर आता पुन्हा बाजारभाव वाढू लागले आहेत. बाजारभाव वाढण्याची वाट पहाणारे शेतकरी आता कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणतील. आंबेगाव तालुका तसेच काही प्रमाणात खेड ,शिरूर तालुक्यातील कांदा विक्रीसाठी मंचर बाजार समितीत येतो.सध्या जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत आहेत. त्यामुळे शेतकºयाला त्याचा पुरेसा मोबदला मिळत नसल्याने शेतकºयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.याचा परिणाम शेतकºयाच्या आर्थिक उत्पन्नावर होत असून त्याला कांद्याचे उत्पन्न घेणे अवघड झाले असल्याचे परिसरातील शेतकºयांनी सांगितलेआहे.
कांद्याचे भाव वाढले, १० किलोस १२० ते २०० रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 6:26 AM