इंदापूर (कळस): देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनेकांदा निर्यात करण्यास बंदी घातली. यामुळे कांद्याचे भाव कोसळतील, असा आरोप करून सर्वच पक्षांनी आंदोलने सुरू केली. मात्र इंदापुर बाजार समितीच्या येथील बाजार आवारात निर्यात बंदी असतानाही सोमवारी (दि २१) १९२ क्विंटल कांद्याची आवक होऊन कमाल ४१०० रुपये, किमान ७०० रुपये प्रति क्टिंटल भाव मिळाला. सोमवारी प्रथमच ४१०० क्विंटल रुपयांपर्यत उसळी मारुन उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
कांदा दरात गेल्या काही दिवसांत भावात वाढ होत आहे. भावात सुधारणा होत असल्याने कांदा उत्पादक मोठया प्रमाणावर माल विकण्यासाठी आवारात आणत आहेत. असे असले तरी यंदा वातावरणामुळे चाळीत साठवलेल्या कांदयाचे सडण्याचे प्रमाण वाढल्याने निम्मा कांदा फेकून देण्याची पाळी कांदा उत्पादकांवर आल्याने भाव वाढीने झालेल्या खर्चाचीच गोळाबेरीज होणार असल्याचे चित्र आहे. इंदापुर या ठिकाणी कांदा लिलाव वार सोमवार, बुधवार व शुक्रवारी होतो बाजार समितीमध्ये सोमवारी १९२ क्विंटल काद्यांची आवक झाली कांद्याच्या दरात उसळी मारुन प्रति किलो ४१ दराने कांदा विक्री झाल्याने तेजी कायम राहणार असल्याचे चित्र आहे. देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात करण्यास बंदी घातली.यामुळे कांद्याचे भाव कोसळतील, असा आरोप करून अनेक पक्षांनी आंदोलने सुरू केली. लोकप्रतिनिधीनी यासंबंधी सरकारकडे पाठपुरावा करून निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी करीत आहेत. बाजारात मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे.बाजार समितीत कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या कांद्यालाही चांगला भाव मिळत आहे. निर्यातबंदी होण्यापूर्वी ३० रुपये भाव मिळत होता. निर्यातबंदीचा निर्णय झाला. त्यानंतर एक दोन दिवस भाव थोडा कमी झाला होता. निर्यातबंदीचे पुढे काय होते, याची प्रतीक्षा असल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्री कमी केली. त्यातच दक्षिण भारतातून कांद्याला मागणी वाढल्याने तेथील व्यापारी महाराष्ट्रात येऊन कांदा खरेदी करत आहेत. त्या भागात पाऊस झाल्याने तेथील लाल कांदा बाजारात उपलब्ध होत नसल्याने त्यांना महाराष्टातून कांदा न्यावा लागत आहे, यामुळे निर्यातबंदी असूनही कांदा दरात तेजी आहे.