शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

कांदा रडवणार! दर आणखी वाढणार; पंधरा वर्षांत पहिल्यांदाच आवक 60 टक्क्यांनी घटली 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 7:50 PM

Onion Prices will increase :गेल्या वर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी आवकाळी पावसाने हाहाकार माजवला. याचा सर्वात मोठा कांदा उत्पादक शेतक-यांना बसला. त्याचे परिणाम आता मार्केटमध्ये दिसत असल्याचे रितेश पोमण यांनी सांगितले. 

- सुषमा नेहरकर शिंदे पुणे :  ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतक-यांना बसल्याने सध्या राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक तब्बल 50-60 टक्क्यांनी घटली आहे. दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात दररोज 170-220 ट्रक कांद्याची आवक होत असते. परंतु सध्या मार्केट यार्डात केवळ 70-80 ट्रक कांद्याची दररोज आवक होत आहे. त्यात हळवी कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, येत्या काही दिवसांत कांद्याच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी लोकमतला सांगितले. (Onion Rates will be increse in coming days.)

गेल्या वर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी आवकाळी पावसाने हाहाकार माजवला. याचा सर्वात मोठा कांदा उत्पादक शेतक-यांना बसला. त्याचे परिणाम आता मार्केटमध्ये दिसत असल्याचे रितेश पोमण यांनी सांगितले.  सध्या हळवी कांद्यााचा (लाल कांदा) हंगाम अंतिम टप्प्यात आल्यामुळे या कांद्यााची आवक कमी झाली असून,  परिणामी बाजारात कांद्यााचा तुटवडा निर्माण झाला आहे. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कांदा दरात तेजी सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो कांद्यााची विक्री ५० ते ६० रुपये दराने केली जात आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत असून,  कांद्याचे दर आणखी वाढू शकतात. 

हळवी कांद्याचा हंगाम फेब्रुवारी अखेर पर्यंत संपतो व याच दरम्यान  गरवी (उन्हाळी कांदा) कांद्यााचा हंगाम सुरू होतो. सध्या गरवी कांद्याची  आवक अल्प प्रमाणात सुरू असल्यामुळे  गेल्या आठवड्याभरापासून बाजारात कांद्यााचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कांदा दरात वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत बाजारात होणारी गरवी कांद्यााची आवक कमी असल्याचे पोमण यांनी सांगितले. 

सध्या घाऊक बाजारात दहा किलो कांद्यााला ३०० ते ३४० रुपये असा दर मिळाला आहे. गेल्या वर्षी गरवी कांद्यााचे उत्पादन उच्चांकी झाले  होते. यंदाच्या वर्षी झालेल्या अवेळी पावसामुळे कांद्यााचे मोठे नुकसान झाले. कांदा बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्याने लागवडीवर मोठा परिणाम झाला. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारात दररोज 170 ते 220 ट्रक कांदा विक्रीस पाठविला जात होता. .पुणे, नाशिक, वाशी या महत्त्वाच्या बाजार आवारात पुणे जिल्हा, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तसेच नाशिक परिसरातून हळवी कांद्यााची आवक होत आहे.अवकाळी पावसामुळे यंदा कांद्याचे रोपही मिळेनायंदा संपूर्ण वर्षे लहरी हवामानाचा फटका शेतक-यांना बसला आहे. त्यात ऑक्टोबर,  ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या आवकाळी पावसामुळे दिवाळीत काढणीला आलेले कांदा पिक वाय गेले, तर उन्हाळी कांद्याच्या रोपाला ही फटका बसला. यामुळे यंदा हजारो शेतक-यांना कांद्याचे रोप देखील मिळण्यासाठी अनेक अडचणी आल्या. आवकाळी पावसामुळे कांदा लागवडीचा हंगाम लांबणीवर पडला आहे. यामुळेच सध्या बाजारात कांद्याची आवक कमी असून, दर वाढत आहेत. - नवनाथ शेळके , कांदा उत्पादक शेतकरी जुन्नर

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी