राजुरी : कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला असून साठवलेला कांदा सडू लागल्याने कांदा फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.जुन्नर तालुक्यात गेल्या वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात कांदालागवड झाली होती. कारण एक-दीड वर्षापूर्वी कांद्याला किलोला ४० ते ५० रुपये बाजारभाव मिळत होता. त्यामुळे कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने यंदाच्या वर्षीही मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली. परंतु, कांद्याला किलोमागे दोन ते तीन रुपये असा बाजारभाव मिळत आहे.इतका कमी बाजारभाव मिळत असल्याने कांद्याच्या पिकाचा झालेला खर्चसुद्धा फिटत नसल्याने भविष्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने कांदा बराकीत साठवून ठेवला होता. सध्या कांद्याला किलोमागे सहा ते सात रुपये बाजारभाव चालु आहे. कांद्याचा बाजारभावच वाढत नसल्याने हा साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी काढला आहे. परंतु शेतकºयांनी साठवलेला कांदा पूर्णपणे सडला आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले. बोरी बुद्रुक गावातील एका शेतकºयाने पाचशे पोती कांदा साठवून ठेवला होता. मात्र दर नसल्याने त्याच्यापुढे समस्या निर्माण झाल्या आहेत.कांदा उत्पादक साठविलेला कांदा आता विक्रीसाठी काढत आहेत. मात्र त्यांच्या कडील साठविलेल्या पोत्यांमध्ये एक पंचमांश पोतीतील कांदा चांगला निघाला आहे. बाकी कांदा सडलेला निघत आहे.सडलेला कांदा टाकायचा कुठे? तर त्यांनी हा कांदा त्याच्या शेतात पांगविला आहे. त्यातच या वर्षीचा नवीन कांदा बाजारात आला असून त्याही कांद्याला अतिशय कमी बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
कांदा उत्पादक अडचणीत; साठवलेला कांदा सडण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:19 AM