शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

चाकण बाजारात कांदा गडगडला, बटाटा, लसूण व हिरव्या मिरचीची आवक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 2:59 AM

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाटा, लसूण, टोमॅटो व हिरव्या मिरचीची प्रचंड आवक झाली. कांद्याची आवक दुपटीने कमी होऊनही कांद्याचे भाव गडगडले. तळेगाव बटाट्याची विक्रमी आवक झाल्याने भाव स्थिर राहिले.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाटा, लसूण, टोमॅटो व हिरव्या मिरचीची प्रचंड आवक झाली. कांद्याची आवक दुपटीने कमी होऊनही कांद्याचे भाव गडगडले. तळेगाव बटाट्याची विक्रमी आवक झाल्याने भाव स्थिर राहिले. जळगाव भुईमूग शेंगाची आवक व भावही स्थिर राहिले. लसणाची आवक वाढल्याने भाव स्थिर राहिले. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, भेंडी व हिरव्या मिरचीची विक्रमी आवक झाली. वांग्याची किरकोळ आवक होऊनही वांग्याचे भाव कोसळले. बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही.चाकणला गुरांच्या बाजारात या आठवड्यात बोकडांच्या संख्येत मोठी वाढ झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, शेपू व पालक भाजीची किरकोळ आवक झाली. कोथिंबिरीची उच्चांकी आवक झाल्याने भाव गडगडले. जनावरांच्या बाजारात बैल, म्हैस व शेळ्या - मेंढ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. जर्शी गार्इंच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल ३ कोटी ७५ लाख रुपये झाली.चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ६३५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ६६५ क्विंटलने वाढल्याने भावात ४०० रुपयांची घसरण झाली. कांद्याचा कमाल भाव २,५०० रुपयांवरून २,१०० रुपयांवर स्थिरावला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १,९५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५०५ क्विंटलने वाढल्याने कमाल भाव ७०० रुपयांवर स्थिरावले. जळगाव भुईमूग शेंगाची एकूण आवक १६ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही कमाल भाव ५,५०० रुपयांवर स्थिरावले. बंदूक भुईमूग शेंगाची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक १२ क्विंटल झाली आहे. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५ क्विंटलने वाढूनही कमाल भावही ५,००० रुपयांवर स्थिरावले.हिरव्या मिरचीची एकूण आवक ३९८ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४८ क्विंटलने वाढूनही या मिरचीचा कमाल भाव २,००० ते ३,००० रुपयांवर स्थिरावला.राजगुरुनगर येथील मुख्य बाजारासह शेलपिंपळगाव येथील उपबाजारात पालक भाजीची काहीच आवक झाली नाही. विशेष म्हणजे, शेलपिंपळगाव येथील उपबाजारात फरशी, चवळी व वाटाणा वगळता फळभाज्यांची काहीच आवक झाली नाही. राजगुरुनगर येथील मुख्य बाजारात हिरवी मिरची, कोबी, काकडी, फरशी, गवार व वाटाणा यांची उच्चांकी आवक झाली, तर हिरव्या मिरचीसह कोबीचे भाव स्थिर राहिले. या बाजारात टोमॅटो, फ्लॉवर, वांगी, भेंडी, दोडका, कारली, दुधीभोपळा, वालवड, ढोबळी मिरची, चवळी व शेवग्याची काहीच आवक झाली नाही.सीताफळ, लिंबाची भाववाढपुणे : फळबाजारात रविवारी आवक कमी झाल्याने सिताफळ व लिंबाच्या भावात वाढ झाली. तर कलिंगड, सफरचंद आणि खरबुजाची आवक वाढली. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने दरात ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे. सिताफळाच्या दरात ३० टक्क्यांनी तर लिंबाच्या भावात गोणीमागे तब्बल १५० रुपयांची वाढ झाली. इतर फळांची आवक मागणीच्या तुलनेत माफक राहिल्याने भावात फारसा चढउतार झाला नाही.पुणे येथील गुलटेकडी बाजार समितीमध्ये भाज्यांची विक्रमी आवकपुणे : गुलटेकडी येथील घाऊक बाजारात रविवारी भाजीपाल्याची विक्रमी आवक झाली. सुमारे २५० ट्रक आवक झाल्याने तसेच पावसामुळे ग्राहकांंनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने बहुतेक फळभाज्यांचे भाव गडगडले. पालेभाज्यांच्या भावात मात्र फारसा चढउतार झाला नाही.मागील दोन आठवड्यांपासून घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढली आहे. आठवड्याभरापूर्वीही बाजारात २०० ते २२५ ट्रक आवक झाली होती. रविवारी हा आकडा ओलंडत सुमारे २५० ट्रक भाज्यांची आवक झाली. मागील काही महिन्यांतील ही आवक विक्रमी ठरली. बहुतेक सर्व भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने भावात घट झाली. कांदा, बटाटा, आले, लसणाचे भाव मात्र स्थिर राहिले. परराज्यातून आंध्रप्रदेश, तामिळनाडु येथुन शेवगा सुमारे ६ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथुन २० टेम्पो हिरवी मिरची आणि ८ टेम्पो कोबी, इंदौर येथुन गाजर ८ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरात येथुन लसूण सुमारे पाच हजार गोणी तर आग्रा, इंदौर, गुजरात आणि तळेगाव येथुन बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली होती. स्थानिक भागातून सातारी आले सुमारे दीड हजार गोणी, टोमॅटो सुमारे ६ हजार क्रेटस, कोबी सुमारे १२ टेम्पो, फ्लॉवर २० टेम्पो, सिमला मिरची १५ टेम्पो, तर भुईमुग शेंग १५० गोणी, पारनेर, पुरंदर, वाई सातारा परिसरातुन मटार सुमारे ८०० गोणी, तांबडा भोपळा १२ टेम्पो, पावटा १० टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी सुमारे १० ते १५ टेम्पो, तर कांद्याची सुमारे ८० ट्रक आवक झाली. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची सुमारे पावणे दोन लाख तर मेथीची सुमारे ३० हजार जुडीची आवक झाली होती. पावसामुळे भिजलेल्या भाज्यांचे प्रमाण अधिक असून ही स्थिती कायम राहिल्यास पालेभाज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.फुलांच्या भावात घटपुणे : फुलबाजारात फुलांची आवक चांगली होत असली तरी मागणीअभावी भावात ३० ते ४० टक्के घट झाली आहे. झेंडूच्या फुलांची आवक सर्वाधिक होत आहे. शनिवारपासून सर्वदुर पाऊस सुरू झाल्याने याचा फटका फुलांना बसण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास गणेशोत्सवाच्या सुरूवातीला फुलांचा दर्जा खालावून भाव घसरण्याची भीती व्यक्त केली आहे. पुढील दोन-तीन दिवसांनी फुलांच्या मागणीत होईल. त्यावेळी भावही चढे राहण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली. रविवारी बाजारात झेंडूला प्रति किलो २० ४० रुपये तर शेवंतीला १०० ते १८० आणि गुलछडीला ३० ते ६० रुपये भाव मिळाला.शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे :कांदा - एकूण आवक - ६३५ क्विंटल. भाव क्रमांक १. २,१०० रुपये, भाव क्रमांक २. १,७०० रुपये, भाव क्रमांक ३. १,००० रुपये.बटाटा - एकूण आवक - १ हजार ९५० क्विंटल. भाव क्रमांक १. ७०० रुपये, भाव क्रमांक २. ६०० रुपये, भाव क्रमांक ३. ४०० रुपये.फळभाज्या :चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे :टोमॅटो - ९१६ पेट्या ( १,५०० ते ३,५०० रु.), कोबी - २८४ पोती ( ६०० ते १,००० रु.), फ्लॉवर - ४२३ पोती ( ४०० ते १,००० रु.), वांगी - ३४७ पोती ( १,५०० ते २,५०० रु.), भेंडी - ४१० पोती ( १,५०० ते ३,५०० रु.), दोडका - ३४२ पोती ( १,००० ते २,००० रु.), कारली - ५१२ डाग ( १,००० ते २,००० रु.), दुधीभोपळा - १४२ पोती ( ५०० ते १,२०० रु.), काकडी - १९२ पोती ( ४०० ते १,००० रु.), फरशी - १४१ पोती ( ८०० ते २,००० रु.), वालवड - १६७ पोती ( १,५०० ते ३,५०० रु.), गवार - २१८ पोती ( १,५०० ते ३,५०० रु.), ढोबळी मिरची - ५९० डाग ( १,००० ते १,८०० रु.), चवळी - ८० पोती ( १,००० ते १,५०० रुपये ),वाटाणा - ३४२ पोती ( १,५०० ते ३,५०० रू.), शेवगा - ३८ पोती ( १,००० ते १,८०० रु. ).पालेभाज्या :चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे :मेथी - एकूण १० हजार ४९० जुड्या ( १,००० ते १,५०० रुपये ), कोथिंबीर - एकूण २० हजार ५३० जुड्या ( १०० ते ३०० रुपये ), शेपू - एकूण ३०० जुड्या ( ५०० ते ६०० रुपये ), पालक - एकूण ४०० जुड्या ( ३५० ते ६०० रुपये ).जनावरे :चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ६० जर्शी गाईंपैकी ३५ गाईंची विक्री झाली. ( ३१,००० ते ६५,००० रुपये ), २३० बैलांपैकी १८० बैलांची विक्री झाली. (१०,००० ते ३५,००० रुपये ), १४० म्हशींपैकी ८५ म्हशींची विक्री झाली. (२०,००० ते १,००,००० रुपये), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ६५०० शेळ्या - मेंढ्यांपैकी ५३०० शेळ्या - मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना ३,००० ते १५,००० रुपये इतका भाव मिळाला. चाकणला गुरांच्या बाजारात १३ हजार ५७० बोकडांची उच्चांकी आवक झाली असून, त्यापैकी ११ हजार २४० बोकडांची विक्री झाली. या बोकडांना ५ हजार ते २० हजार रुपये असा भाव मिळाला.