ओतूर : येथील उपबाजारात रविवारी कांद्याची १७ हजार ७६ किलो कांदा पिशव्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेली कांद्याच्या भावातील घसरण रविवारीही कायम राहिली. प्रतवारीनुसार नं.१ गोळा कांद्यास १० किलोस ३०१ ते ३५१ रुपये बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यापेक्षा नं१ गोळा कांद्याचे बाजारभावात प्रतवारीनुसार २०० रुपयांची घसरण झाल्याची माहिती, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
रविवारी प्रतवारीनुसार १० किलोचे भाव : कांदा नं.१(गोळा) ३०१ ते ३५१ रुपये.
कांदा नं.२. २०१ ते ३०० रुपये.
कांदा नं ३ -(गोल्टा) १५१ ते ३०० रुपये.
कांदा नं.४ (बदला) ५ ते २०० रुपये.
बटाटा बाजार : रविवारी ओतूर उपबाजार आवारात ६४ पिशव्यांची आवक झाली. .प्रतवारीनुसार १० किलोस १०० ते ३१० रुपये बाजारभाव मिळाले. बाजारभाव स्थीर राहिले आहेत अशी माहिती ओतूर उपबाजार आवार कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.