पोलिसांकडून कुटुंबीयांना कोणताही त्रास दिला जात नसला तरी लग्नतारखेच्या दोन दिवस आधी पोलिसांकडून परवानगी दिली जाते. त्यामुळे ती सर्वप्रथम मिळविण्यासाठी कुटुंबीयांना पोलीस स्टेशनची धाव घ्यावी लागत आहे. किमान सात दिवस आधी ही परवानगी मिळावी, असे वधू-वरांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
------------------------------------
दोन दिवसांमागील परवानगीचे कारण काय?
दिवसागणिक कोरोनाच्या आकडेवारीमध्ये चढउतार होत आहेत. आठवड्याभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा उद्रेक होण्याची शक्यताही असू शकते. तसे झाल्यास शासनस्तरावर नियमावलीमध्ये बदल देखील केला जाऊ शकतो. लग्नकार्यावर देखील निर्बंध येऊ शकतात. या सर्व शक्यता गृहीत धरूनच पोलिसांकडून दोन दिवस आधी लग्नकार्याला परवानगी दिली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
-------------------------------------------------------------------------
माझं उद्या (दि. ३) लग्न आहे. घरात मी एकटा धावपळ करणारा आहे. लग्नकार्यामध्ये ५० च्या वर लोकांना परवानगी नाही. जर संख्या अधिक झाली तर कार्यालयाचे गेट बंद केले जाईल, असे कार्यालयाच्या संचालकांकडून सांगण्यात आले आहे. एकीकडे हे टेन्शन असताना लग्नासाठी दोन दिवस आधी परवानगी घेण्यासाठी अर्ज करावा लागतो. आधारकार्ड, पत्रिकेची झेरॉक्स, कार्यालयाची नियमावली सर्व सादर करावे लागते. मी परवानगी घेण्यासाठी सकाळी १० वाजता गेलो आणि पोलीस दुपारी १ वाजता आले. त्यामुळे खूप मनस्ताप झाला. पोलिसांनी कुटुंबीयांना अर्ज करण्यासाठी आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी.
- अक्षय बोरवले, तरुण
--------------------------------------
कार्यालयांवर निर्बंध आहेतच. पण वधू-वराकडच्या मंडळींवर देखील हे निर्बंध असायला हवेत, याकरिता त्यांना पोलीस परवानगी घेण्यास सांगितले आहे. लग्नकार्यात सहभागी होणाऱ्या नातेवाइकांकडून नियमांचे पालन होते आहे की नाही याची जबाबदारी वधू-वराच्या कुटुंबीयांची आहे. ते देखील बांधील आहेत. आमच्या कार्यालयात लग्नकार्य होताना कुटुंबीयांना यादी तयार करायला सांगतो. ज्यांनी लस घेतली आहे त्यांची वेगळी यादी करा किंवा येण्यापूर्वी अँटीजन टेस्ट करा, असा सल्ला आम्ही देतो.
- प्रसाद दातार, प्रतिज्ञा मंगल कार्यालय
---------------------