शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आॅनलाइन बुकिंगचा प्रस्ताव बासनात

By admin | Published: December 27, 2016 3:35 AM

एकीकडे ‘डिजिटल इंडिया’चा नारा सत्ताधारी पक्षाकडून दिला जातोय. कॅशलेस व्यवहारांकडे देशाचा आर्थिक प्रवास सुरू झाला आहे. नेट बँकिंग, कार्डस्च्या वापराला अधिकाधिक

- नम्रता फडणीस/प्रज्ञा केळकर-सिंग, पुणे

एकीकडे ‘डिजिटल इंडिया’चा नारा सत्ताधारी पक्षाकडून दिला जातोय. कॅशलेस व्यवहारांकडे देशाचा आर्थिक प्रवास सुरू झाला आहे. नेट बँकिंग, कार्डस्च्या वापराला अधिकाधिक चालना देण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु हा बदल स्वीकारण्यास समाजातील काही घटकांची जशी मानसिकता नाही तसे नाट्य क्षेत्रदेखील आपली पारंपरिक चौकट मोडण्यास अद्याप तयार नाही. त्यामुळेच महापालिका प्रशासनाने नाट्यगृहांचे ‘आॅनलाइन’ पद्धतीने बुकिंग करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याची इच्छा प्रदर्शित केली असूनही, नाट्य-लावणी निर्माता, कलाकार आणि संयोजकांनी विरोध दर्शविलेला आहे. त्यामुळे हा चांगला प्रस्ताव बासनात गुंडाळण्याची वेळ आली आहे. सध्या महापालिकेच्या नाट्यगृहांचे चौमाही पद्धतीने वाटप केले जाते. नाट्य, लावणी निर्माते, सामाजिक संस्था यांना व्यवस्थापकांकडून सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकांच्या प्रयोगासाठी तारखा दिल्या जातात. समोरासमोर या तारखांचे वाटप करण्यात येत असल्यामुळे सर्वांना समान न्याय दिला जातो. मात्र, नाट्यगृहांचे बुकिंग ‘आॅनलाइन’ पद्धतीने झाल्यास एकाच व्यक्तीकडून तारखा आरक्षित होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नाट्य, लावणी निर्मात्यांना तारखाच मिळू शकणार नाहीत, असे झाल्यास नाट्यव्यवसाय अडचणीत येण्याची भीती नाट्य, लावणी निर्माता आणि संयोजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे नाट्यगृहांचे आॅनलाइन बुकिंग झाल्यास प्रशासनाचा निम्म्याहून अधिक भार हलका होणार आहे. राजकीय कार्यक्रमांसाठी ऐनवेळी तारखा काढून टाकण्याच्या गोष्टींना काही प्रमाणात आळा बसेल, असे व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. यामधून आता नाट्यगृहांच्या आॅनलाइन बुकिंगमधून खासगी संस्थांना वगळणे आणि एका व्यक्तीला ठराविक कार्यक्रमांचे बुकिंग करता येणे अशा स्वरूपाच्या नियमावलीद्वारे सुवर्णमध्य काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. नाट्यगृहांच्या चौमाही वाटपामुळे कुणाला तारखा दिल्या आहेत, हे कळू शकते. हे आॅनलाइन झाल्यास हे कळले जवळपास दुरापास्तच होईल. एखाद्या हैदराबादमधील उद्योगपतीने १० लाख रुपये भरून तारखा बुक केल्या तर आम्ही काय करायचे? त्यामुळे आॅनलाइनला आमचा विरोध राहाणारच आहे. नाटकांची तिकीट विक्री आॅनलाइन जरूर करावी, पण नाट्यगृहांचे चौमाही वाटपच राहिले पाहिजे.- सुनील महाजननाट्यगृहांचे आॅनलाइन बुकिंग झाले तर प्रशासनाचे नियंत्रण राहणार नाही. कुणीही कितीही तारखा बुक करू शकेल आणि नाट्य-लावणी निर्माते, संयोजक यांना तारखा मिळणार नाहीत. हे करायचे झाल्यास वेगळी यंत्रणा आणि नियमावली कार्यान्वित करावी लागेल. त्यामुळे नाट्यगृहांचे आॅनलाइन बुकिंग करण्यापेक्षा नाट्यगृहांची संपूर्ण माहिती (आसनक्षमता, लोकेशन) आॅनलाइन द्यावी.- मोहन कुलकर्णी, नाट्य संयोजक आॅनलाइन बुकिंगची प्रक्रिया राबविल्यावर ऐन वेळी कार्यक्रम रद्द करता येणार नाहीत. लावण्यांचे कार्यक्रम ऐन वेळेला काही कारणांनी रद्द किंवा पुढे ढकलावा लागल्यास, आॅनलाइन बुकिंगमध्ये ती सोय नाही. या प्रक्रियेच्या माध्यमातून खासगी संस्थांना जास्त तारखा मिळाल्यास लावणी संघ, नाट्य निर्माता संघाची अडचण होऊ शकते. त्यामुळे आॅनलाइन बुकिंग प्रक्रियेला विरोध करण्यात आला आहे. मात्र, एका व्यक्तीला जास्त कार्यक्रमांचे बुकिंग करण्याची परवानगी नसणे, या प्रक्रियेतून खासगी संस्थांना वगळणे, अशा पर्यायांवर विचार सुरू आहे. - मेघराज राजेभोसले, अध्यक्ष लावणी निर्माता संघएखादी नाट्य संस्था चार महिन्यांचे आगाऊ बुकिंग करते. आॅनलाइन बुकिंग सुरू केल्यास या तारखांमध्ये बदल करणे अवघड असते. एखाद्या कार्यक्रमाचे बुकिंग झाले तरी ऐनवेळी कलाकार उपलब्ध न झाल्यास अडचण होते. तारखांचे आगाऊ बुकिंग झाले तरी नाट्यसंस्था एकमेकांसमवेत चर्चा करून तारखा एकमेकांना देतात. प्रत्यक्षात, एखाद्या संस्थेचे दोन दिवस बुक करण्याची सोय आॅनलाइन सिस्टिममध्येही करता येऊ शकते. आॅक्टोबर महिन्यात यासंदर्भातील बैठक झाली होती. मात्र, कलाकार आणि नाट्य संस्थांकडून त्याला विरोध करण्यात येत आहे. विरोध केल्यानंतर यासंदर्भात एकानेही विचारणा केली नाही. या प्रक्रियेमुळे एखाद्या राजकीय कार्यक्रमासाठी दुसरा कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता कमी होऊ शकते. सर्व प्रक्रिया आॅनलाइन होत असल्याने अचानक कार्यक्रम रद्द करणे शक्य होणार नाही.- भारत कुमावत, नाट्यगृह व्यवस्थापक