पुणे : आॅनलाईन वीजबिल भरणाऱ्यांच्या संख्येत पुणेकरांनी आघाडी घेत राज्यातील आॅनलाईन भरणा करणाऱ्या मंडलांमध्ये पहिले स्थान पटाविले आहे. पुणे परिमंडलात आॅनलाईन वीज बिल भरणाऱ्यांची संख्या ९ लाख ५२ हजार झाली असून आॅगस्ट महिन्यात तब्बल १७६ कोटी ९४ लाख रुपये आॅनलाईनच्या माध्यमातून महावितरणच्या तिजोरीत जमा झाले आहेत. राज्यात सद्य:स्थितीत सुमारे ४५ लाख लघुदाब वीजग्राहक वीजबिलांचा दरमहा आॅनलाईन भरणा करीत आहेत. यात पुणे परिमंडलातील ९ लाख ५२ हजार (२१ टक्के) वीजग्राहकांची संख्या राज्यात सर्वाधिक असून, त्या नंतर भांडूप व कल्याण परिमंडलात सुमारे पावणेसात ते सात लाख वीजग्राहक वीजबिलांचा आॅनलाईन भरणा करत आहेत. आॅगस्ट २०१८मध्ये पुणे शहरातील ५ लाख ६४ हजार वीज ग्राहकांनी १०० कोटी ४१ लाख, पिंपरी चिंचवड शहरातील २ लाख ७१ हजार वीजग्राहकांनी ५१ कोटी रुपये, तसेच मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्यातील १ लाख १७ हजार वीज ग्राहकांनी २५ कोटी ४८ लाख रुपयांचा ह्यआॅनलाईनह्ण भरणा केला आहे.लघुदाब वीजग्राहकांसाठी आॅनलाईन बिल भरण्यासाठी www.ZÔhÔdiscoZ.हे संकेतस्थळ असून जून २०१६ पासून मोबाईल अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा आॅनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट आणि डेबीट कार्डसह मोबाईल वॅलेट, तसेच कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. या शिवाय भरलेल्या रक्कमेच्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वत:च्या अनेक वीज जोडण्यांचे बिल देखील भरता येत आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणचे संकेतस्थळ व मोबाईल अपवरून वीज बिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणे केले आहे.-------------------------आॅनलाईन वीजभरणा झाला नि:शुल्कक्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे बिल भरण्यासाठी आॅनलाईन भरणा करण्याचे पर्याय आता नि:शुल्क करण्यात आले आहेत. याआधी नेटबँकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा आॅनलाईन भरणा करण्यासाठी पाचशे रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु, क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून आॅनलाईनद्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क करण्यात आला आहे.
आॅनलाईन वीज बिल भरणा मीटर फास्ट : पुणे परिमंडळ राज्यात अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 9:00 PM
आॅनलाईन वीजबिल भरणाऱ्यांच्या संख्येत पुणेकरांनी आघाडी घेत राज्यातील आॅनलाईन भरणा करणाऱ्या मंडलांमध्ये पहिले स्थान पटाविले आहे.
ठळक मुद्देआॅनलाईन ग्राहक संख्या पोहोचली साडेनऊ लाखांवरतब्बल १७६ कोटी ९४ लाख रुपये आॅनलाईनच्या माध्यमातून महावितरणच्या तिजोरीत जमा