लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मार्केटिंग फर्मची फेसबुकद्वारे जाहिरात करून चॅटिंगद्वारे विश्वास संपादन करीत मोबाईल खरेदीसाठी बँकेमध्ये पैसे भरण्यास लावून एकाची फसवणूक केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विन राम कन्हन (प्रोप्रा. जे. आर. मार्केटिंग ४७, फर्नांडिस कॉम्प्लेक्स, अॅलेक्सनगर अॅलन चोलाईन कन्याकुमारी, तमिळनाडू) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. आशिष सूर्यवंशी (वय ३२, रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी कन्हन याने जे. आर. मार्केटिंग फर्मची फेसबुकद्वारे जाहिरात केली. फिर्यादी यांच्याशी व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करून त्यांचा विश्वास संपादन केला आणि फिर्यादीला मोबाईल खरेदीसाठी बँकेच्या खात्यावर २५ हजार रुपये भरण्यास सांगितले. ते भरल्यानंतर फिर्यादीशी संपर्क तोडून व्हॉट्सअॅपवर त्यांचा नंबर ब्लॉक केला.
आॅनलाइन फसवणूक; गुन्हा दाखल
By admin | Published: July 07, 2017 3:36 AM