शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

आॅनलाईन फ्रॉड वाढले

By admin | Published: December 30, 2016 4:32 AM

माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून देशात कॅशलेस व्यवहार सुरु करण्याचे केंद्र शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. नोटाबंदीनंतर याबाबत मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात येत

पुणे : माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून देशात कॅशलेस व्यवहार सुरु करण्याचे केंद्र शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. नोटाबंदीनंतर याबाबत मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाने थेट अ‍ॅपही सुरु केले आहेत. परंतु या कॅशलेस व्यवहारांमधून आॅनलाईन फ्रॉड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नोटाबंदीपासून ५0 दिवसांमध्ये अशा शेकडो तक्रारी सायबर गुन्हे शाखेकडे दाखल झाल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी रात्रीपासून पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा चलनामधून बाद केल्या. या निर्णयाचे देशभरात स्वागत करण्यात आले तसाच मोठ्या प्रमाणावर विरोधही झाला. वेळोवेळी नवनवीन नियम सांगतानाच कॅशलेस व्यवहार करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले. परंतु कॅशलेस व्यवहार सर्वसामान्य आणि गोरगरिबांना जमणार का हा प्रश्न आहे. जेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुशिक्षितांनाच कोट््यवधी रुपयांचा गंडा घालण्यात येत आहे, तेथे गोरगरीब अशिक्षितांचा निभाव कसा लागणार हा प्रश्न आहे. पुण्यासारख्या प्रगत शहरामध्येही सायबर गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. पोलिसांकडे वर्षाला दाखल होणाऱ्या तक्रारींचे प्रमाण लक्षणीय आहे. पोलिसांकडून या तक्रारी दाखल करुन घेतल्या जात असल्यामुळे नागरिकांना किमान दिलासा मिळतो. बँक खात्यांची आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरुन तसेच ई मेल हॅक करुन , कार्डाचे क्लोनिंग अशा एक ना अनेक प्रकारच्या पद्धती वापरुन चोरटे नागरिकांची खाती रिकामी करीत आहेत. या गोरख धंद्यामध्ये दिल्लीमधील कॉल सेंटर्स मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. यासोबतच बँकांकडून होणारे केवायसी पॉलिसीबाबतचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणे जेवढे सोईस्कर होणार आहे, तेवढेच ते धोकादायकही असणार आहे. घरबसल्या नागरिकांच्या खात्यांमधून रातोरात लाखो रुपये लंपास करण्याच्या घटना आगामी काळातही मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा धोका आहे. ग्राहकाला मोबाईलवर फोन करुन बँकेचा वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली जाते. त्यांच्याकडून एटीएम अथवा क्रेडीट कार्डची माहिती विचारुन घेतली जाते. त्या माहितीच्या आधारे खात्यामधून लाखो रुपये वर्ग करुन घेतले जातात. यासोबतच ई-मेल आणि फोन कॉल्स अथवा मेसेज पाठवून अशा प्रकारची फसवणूक केली जात आहे. पुण्यामध्ये गेल्या दहा महिन्यांत अशा प्रकारे नागरिकांना तीन कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. (प्रतिनिधी)तरुण, नोकरदार व गृहिणींचे प्रमाण अधिकपोलिसांकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, महाविद्यालयीन तरुण, नोकरदार व गृहिणींचे प्रमाण यात अधिक आहे. विविध विमा कंपन्यांच्या नावे ग्राहकांना फोन करून त्यांच्या चालू अथवा पूर्ण होत आलेल्या पॉलिसींचे पैसे तसेच त्यासोबतच आणखी जास्ती रकमेचे पॅकेज देण्याचे आमिष दाखवले जाते. त्या बदल्यात ग्राहकांना दिलेल्या बँक खात्यावर पैसे भरायला लावले जातात. लाखो रुपये भरल्यानंतरही ग्राहकांना पैसे मिळत नाहीत. ८ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर (५0 दिवस) दरम्यान दाखल तक्रारीप्रकार अर्जक्रेडीट/डेबीट/एटीएम कार्ड७७माहिती चोरुन पैसे वर्ग करणे२२६बनावट क्रेडीट कार्ड२२३इन्श्युरन्स फ्रॉड0३ई मेल हॅक करुन पैसे वर्ग करणे0२आॅनलाईन बिझनेस फ्रॉड २१सोशल नेटवर्किंग९१मल्टी लेवल मार्केटींग0१हॅकिंग२७मोबाईलसंदर्भात गुन्हे१५लॉटरी फ्रॉड१८