शेलपिंपळगाव : भक्तिमय विचारधारणेतून संघटित युवा शक्ती श्री देवदर्शन यात्रा समितीच्या वतीने ऑनलाइन आयोजित केलेल्या घरगुती गौरी-गणेशोत्सव सजावट प्रदर्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोविड काळात प्रत्यक्ष श्रीगणेशाचे दर्शन घेणे शक्य नव्हते. या पार्श्वभूमीवर समितीने नोंदणीकृत सर्वांच्या घरगुती गणेश उत्सवाची छायाचित्रे ऑनलाईन पद्धतीने प्रदर्शित केली होती. विशेष म्हणजे या संकल्पनेस शेकडो कुटुंबांचा प्रतिसाद लाभला आहे.
घरगुती गणेशोत्सव सजावटींसाठी नीलम आवटे (खराडी), प्रशांत शिंदे (नांदेड सिटी) व रोहित काटे (दापोडी) यांनी प्रमुख तीन पारितोषिके मिळविली. आदर्श मुचंडी (बेळगाव), कल्पेश तारू (कसबा पेठ), दिव्या गाढवे (वडगावशेरी), ऋतुराज वाघमारे (हिंगणे) यांस उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त झाले आहे.
घरगुती गौरी-गणेशोत्सव सजावटींसाठी विशाल सणस (चंदननगर), सुरेखा कासार (सांगली), शिल्पा कुरळे (चिंचवड) यास प्रमुख तीन पारितोषिके आणि विक्रांत लावंड (कोरेगाव पार्क), तेजस गायकवाड (काळेवाडी फाटा), पल्लवी लगाडे (विनोदेनगर), प्रीतम साळुंके (कलवड) यास उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. विजेत्या, तसेच प्रदर्शनात सहभाग नोंदविलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आल्याचे देवदर्शन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.