या अभिवादन सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे ट्रस्टी चेअरमन ॲड. बी. के. बर्वे यांनी भूषविले. सभेला महाराष्ट्र, गुजरात, हरयाना, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यांतील राज्यपदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. डॉ. राजाराम बडगे (अध्यक्ष, महाराष्ट्र) यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
ट्रस्ट्री महासचिव ॲड. सुभाष जौंजाळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून मानवंदना दिली. केंद्रीय सल्लागार समिती सदस्य एस. आर. नरवाडे यांनी वंदनेद्वारा गाथा पठण केले. ‘भगवान बुद्ध का विशुद्धी मार्ग’ या विषयावर धम्मदेसना देण्यात आली. यामध्ये सल्लागार कमिटी सदस्य ॲड. एस. टी. गायकवाड, एस. आर. नरवाडे, हरयाणा अध्यक्ष सनवीर बौद्ध, मुंबई प्रदेश अध्यक्ष ॲड. संदीप बर्वे, महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राजाराम बडगे, तेलंगणाचे महासचिव बालनारायण वेदा, छत्तीसगडचे उपाध्यथा डॉ. आर. के. सुखदेवे आदींनी सहभाग घेतला. सभेची सांगता अध्यक्ष ॲड. बी. के. बर्वे यांच्या भाषणाने झाली. सेक्रेटरी अमर दीपंकर यांनी सूत्रसंचालन केले.