भावे शाळेतील शिक्षकांचा उपक्रम
पुणे : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची भावे प्राथमिक शाळा पुण्यातील एक उपक्रमशील शाळा आहे
दर वर्षी शाळा विविध विषय घेऊन शैक्षणिक प्रयोग करत असते.
कोरोनाच्या या वर्षात ही "शाळा बंद, पण शिक्षण सुरू" या पंक्तीला अनुसरून अनेक गुणवत्तापूर्ण, सखोल ज्ञान देणारे शैक्षणिक व्हिडिओ शिक्षकांनी खास ई. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करुन अध्ययन-अध्यापन रंजक केले. आत्तापर्यंत 1400 व्हिडिओ तयार असून त्याद्वारे मुले व पालक शिकत आहेत. हेच व्हिडिओ आता शाळेच्या यू-ट्यूब चॅनलवर अपलोड करुन ते महाराष्टातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम शाळेने हाती घेतले आहे. ऑनलाइन शाळा असताना प्रत्येक विद्यार्थ्याला हजर राहता येईल असे होत नाही अनेकांच्या घरी एकच मोबाईल असतो आणि आईवडील दिवसभर कामानिमित्त बाहेर असतात संध्याकाळी घरी आली की ते त्यांना पाहता यावे म्हणून शिक्षकाच्या मदतीने शैक्षणिक धडे धडे बनवण्यात आलेले आहेत ते यू-ट्यूब वरती अपलोड करण्यात आलेले आहेत, राज्यभरातील विद्यार्थ्यांना याद्वारे शिक्षणाचा आनंद घेता येईल, असे मत शाळेचे मुख्याध्यापक अनिल खिलारे यांनी व्यक्त केले शाळेच्या सभागृहात यू-ट्यूब चॅनल या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या समन्वयक डॉक्टर मानसी भाटे व प्रा. चित्रा नगरकर यांच्या हस्ते नुकतेच झाले.