संसदेचे उदघाटन ११ जानेवारीला दुपारी दोन वाजता होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुश्री उमा भारती, केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री देवाश्री चौधरी, उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशच्या राज्यापाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय आदिवासी कामकाज राज्यमंत्री रेणुका सिंग, खासदार डॉ. दिव्या कुमारी, सुप्रसिद्ध नृत्यंगणा पद्मभूषण डॉ. मल्लिका साराभाई, द कॉमन वेल्थच्या महासचिव पार्टीशिया स्कॉटलँड, पार्श्वगायक पद्मश्री कैलास खेर आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा रितू छाब्रिया उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे असतील.
संसदेत नऊ सत्रांचे आयोजन केले आहे. त्यामधे औद्योगिक-राजकीय नेतृत्व, व्यवस्थापन, चित्रपट, माध्यमे, क्रीडा, संशोधन, महिला आणि अध्यात्म या विषयावर विविध तज्ञ संबोधित करणार आहेत.
१४ जानेवारीला होणाऱ्या समारोप समारंभात
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुरमू , समाजसेविका मेधा पाटकर, सेवाच्या संस्थापिका पद्मभूषण डॉ. ईलाबेन भट, आदित्य बिर्ला फाउंडेशनच्या प्रमुख राजश्री बिर्ला, युकेच्या हाउस ऑफ लॉर्डच्या सदस्या संदीप के. वर्मा, खासदार प्रणित कौर, जम्मू येथील महाराजा हरिसिंग ट्रस्टच्या उपाध्यक्षा रितूसिंग उपस्थित राहणार आहेत.