बाभूळगाव: राज्यस्तरीय ऑनलाईन म्युझिक ऑलिंपियाड स्पर्धेत खोरोची (ता.इंदापूर) येथील पृथ्वीराज नानासाहेब खरात याने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविल्याने इंदापूर तालुक्याचे नाव राज्यात उंचावणाऱ्या पृृृृथ्वीराज खरात याचा शिरसोडी ग्रामस्थांच्या वतीने पांडुरंग मारकड व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सदस्य महेंद्र रेडके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर यांनी लॉकडाऊन काळात राज्यस्तरीय ऑनलाईन म्युझिक ऑलिंपियाड स्पर्धेचे आयोजन केले होते. यासाठी राज्यभरातील ५ वी ते १० वी या गटातील ७ हजाराहून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामध्ये खोरोची (ता.इंदापूर) येथील पृृथ्वीराज नानासाहेब खरात याने राज्यात पहिला येण्याचा मान मिळविला. खरात हा इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत आहे. त्याला संगीत शिक्षक निखिल कुलकर्णी व विद्यालयाचे प्राचार्य ज्योती जगताप यांचे मार्गदर्शन मिळाले.
दम्यान, पृथ्वीराज खरातने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचा नागरिकांनी सत्कार केला. यावेळी अप्पासाहेब माने प्रसाद पाध्ये, देविदास वाघमोडे, संतोष कुंभार आदी उपस्थित होते.
————————————————————————
पृथ्वीराज खरात याचा शिरसोडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करताना पांडुरंग मारकड, महेंद्र रेडके व इतर.
०९०१२०२१-बारामती-१०
-----------------------------