या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी २ ऑगस्टपर्यंत राहणार आहे. याबाबतची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही ट्विट करून दिली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयमार्फत बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दरवर्षी बारावी परीक्षानंतर या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने अर्ज करतात. बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेशप्रक्रियेची सर्व माहिती "डीटीई''च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
-----
हॉटेल व्यवस्थापनासाठी बारावीत ३५ टक्के हवे
औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा विज्ञान शाखेसह बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सरफेस कोटींग अभ्यासक्रमासाठी इंग्रजी, भौतिकशास्त्र व गणित हे विषय घेऊन बारावी परीक्षा उत्तीर्णाची अट आहे. हॉटेल व्यवस्थापनासाठी बारावीत कमीत कमी ३५ टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
-----
५ ऑगस्टला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणार
प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करण्यासाठी १० जुलै ते २ ऑगस्ट असा कालावधी आहे. ५ ऑगस्ट रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. या यादीवरील हरकतीसाठी ६ ते ८ ऑगस्ट अशी मुदत आहे. १० ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणार आहे.