राहू : आॅनलाईन सात-बारा ही महाराष्ट्र शासनाची योजना दिशाभूल करणारी ठरत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. तलाठ्याकडच्या लेखी सात-बाऱ्यावरून आॅनलाईन रेकॉर्ड करताना संबंधित खात्याने सात-बारा उताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका ठेवल्या आहेत. त्यामुळे लेखी सात-बारा आणि संगणकीकृत सात-बारा यांमध्ये फरक पडत आहे. संगणकीकृत सात-बारे घेण्यासाठी सेवा नेहमीच विस्कळीत राहिल्याने शेतकऱ्यांना आठ-आठ दिवस तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून सात-बारा मिळत नसल्याची एकंदरीत परिस्थिती आहे.सात-बाऱ्यातील चुकांमुळे बँकांमध्ये कर्ज घेण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जोपर्यंत संगणकीकृत सात-बारा दुरुस्त होत नाही, तोपर्यंत तलाठ्याकडचे लेखी सात-बारे सर्व खात्यांमध्ये लागू करावेत, अशी मागणी शेतकरीवर्गामधून पुढे आली आहे. संगणकीकृत सात-बाऱ्यावर पीक पाहणीस खातेदाराच्या नावाचा उल्लेखच आढळून येत नसल्याने पिके, विहीर व बोअर, पड यांच्या मालकी हक्क व तांबेवहिवाटी दिसत नाहीत. प्रत्यक्षात संगणकाचे काम अर्धवट झालेले असल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये पीक पाहणीचा अंदाज येत नसल्याचे संबंधित खात्याच्या अधिकारीवर्गाकडून समजते. चार वर्षांपासून संगणकीकृत सात-बारा करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. शासनाच्या या ढिसाळ धोरणामुळे शेतकरी मात्र वेठीस धरला जात असल्याची वस्तुस्तिथी आहे. दुय्यम निंबधक तलाठ्याचा हस्तलिखित व सहीशिक्क्याचा सात-बारा व पीक पाहणी विचारात घेत नाहीत. त्यामुळे अशा सात-बाऱ्यावर जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हे व्यवहार पार पाडताना शेतकऱ्यांना आर्थिक तडजोडी करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. खरेदीखताच्या वेळी दुय्यम निबंधक कार्यालयात चुकीचा सात-बारा व पीक पाहणी यांमुळे स्टॅम्प ड्युटी मोठ्या प्रमाणावर भरावी लागत आहे. आॅनलाईन सात-बारे करण्यासाठी महसूल विभागाचे कर्मचारी काम करीत आहेत; परंतु आॅनलाईन सात-बारे जतन करणाऱ्या सॉफ्टेवअरमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहे. त्यामुळे संगणकीकृत सात-बारा काढायचा झाल्यास सर्व्हर नेहमीच बंद असतो. परिणामी, शेतकऱ्यांना सात-बारा मिळण्यासाठी विलंब होत असल्याची वस्तुस्थिती आहे.- प्रशांत बेंडसे, नायब तहसीलदार, दौंडसात-बारा हा विषय किती गांभीर्याचा आहे, याची जाणीव महसूल विभागाला नाही. संगणकीकृत आणि हस्तलिखित सात-बारा यांमध्ये फरक असण्याचे कारण नाही. ज्यांनी संगणकीकृत सात-बारे करताना चुकीच्या नोंदी केल्या आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. - बन्सीलाल फडतरे, आदर्श सरपंच कोरेगाव
आॅनलाईन सात-बाराचा उडाला बोजवारा
By admin | Published: July 15, 2016 12:31 AM