हडपसर : नोटाबंदीनंतर आॅनलाइन बँकेच्या व्यवहार करण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आवाहन करीत आहे. मात्र, या बँकेच्या आॅनलाइन ट्रँझॅक्शनमध्ये सर्वसामान्यांची फसवणूक होते आहे. ही फसवणूक बँक कर्मचा-यांसाठी नित्याची असली तरी सर्वसामान्यांना मानसिक त्रास होत असून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.केशवनगर येथे राहणाºया मनोज दाभाडे यांचे परवा रात्री बाराच्या दरम्यान केवळ २० मिनिटांत ४९,०६० बँकेतून ट्रान्स्फर करून घेतले गेले. त्याबाबत त्यांनी बँक कर्मचाºयांशी संवाद साधला असता त्यांना काही नवल वाटले नाही. अशाच तक्रारी नेहमीचे त्यांच्याकडे येत आहेत. ते फक्त कागदोपत्री मुख्य आॅफिसला त्या तक्रारी दाखल करतात. मात्र, यावर कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे नुकसान होत आहे. हडपसर औद्योगिक वसाहतीमधील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत दाभाडे यांचे खाते आहे.१२ तारखेच्या रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी त्यांना दहा हजार रुपये बँक खात्यातून काढून घेतल्याचा संदेश आला. त्यानंतर असे सहा संदेश त्यांना लागोपाठ केवळ २० मिनिटांत आले. त्यामध्ये १०,००० रुपये काढल्याचे चार संदेश आले. तर एक ५ व एक ४ हजार काढल्याचा संदेश आला. त्यानंतर मेसेजमधील नंबरवर तातडीने कॉल करून कार्ड ब्लॉक करण्यास दाभाडे यांनी सांगितले. दाभाडे म्हणाले, ‘‘माझ्याकडून रिव्हर्स फॉर्म भरून घेतला; परंतु खात्यामधून गायब झालेले पैसे परत मिळण्याची शक्यता नाही.’’रात्रभर दाभाडे मोबाइलवरून कस्टमर केअरशी बोलण्याचा प्रयत्न करीत होते; परंतु त्यांचे बँकेच्या कस्टमर केअरशी बोलणे झाले नाही. दुसºया दिवशी ते बँकेत जाऊन अचानक पैसे गायब कसे झाले, याची विचारणा करण्यासाठी फोन लावण्याचा प्रयत्न करीत होते; परंतु ग्राहक सेवा केंद्रावरून कुठल्याही प्रकारच्या मदत मिळाली नाही.दुसºया दिवशी बँकेत गेल्यावर काउंटरवर असलेल्या संबंधित अधिकाºयाला झालेल्या प्रकार समजावून सांगितला.
आॅनलाइन ट्रँझॅक्शनने सामान्यांची फसवणूक, २० मिनिटांमध्ये ५० हजार गमावण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 3:27 AM