पुणे : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या व्यक्तीना आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी प्रक्रिया व नियम बऱ्याच अर्जदारांना माहिती नसते. सदयस्थितीत जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन केली आली आहे. सदर नव्याने कार्यान्वीत केलेल्या प्रणालीचा वापर करुन जास्तीत जास्त अर्जदारांना जात प्रमाणपत्र पडताळणी करणे व सदर कार्यपध्दतीत येणा-या अडचणी सोडविण्यसाठी ऑनलाईन वेबिनारचे गुरुवार (दि.२५) रोजी आयोजन केले आहे. या प्रवर्गातील अर्जदारांनी ऑनलाईन वेबीनारमध्ये सहभागी होवून जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेची माहिती करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य नितीन ढगे यांनी केले आहे.
लॉगीन आयडी :- Meeting ID: 84354254617, पासवर्ड- Passcode: xB05YN