पुणे: खडकवासला धरण प्रकल्पात सध्या केवळ १४.३३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र,उन्हाळी आवर्तन रद्द करण्याचा निर्णय झाल्याचे जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांपासून अधिका-यांपर्यंत सर्वच बोलत असल्याने पुणेकरांच्या डोक्यावरील पाणी कपातीची टांगती तलवार दूर झाली आहे. परंतु, वाढलेली लोकसंख्या आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा विचार करता काटकसरीनेच पाणी वापरावे लागणार आहे.सध्या धरणात मागील तीन वर्षातील सर्वात कमी पाणीसाठा आहे. पुणे महापालिका व परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरण प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यातून नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने दिला आहे. मात्र,धरणातील पाणीसाठा कमी असल्याने आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे निश्चित झाल्याने यंदा उन्हाळी आवर्तन सोडले जाणार नसल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. पुणे महापालिकेकडून १३५० एमएलडी पाणी वापरले जात असून पुण्याला पाणी कमी पडू देणार नाही,असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट दूर झाले आहे. परंतु,गेल्या तीन वर्षाचा विचार करता यंदा धरणात सर्वात कमी १४.३३ पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी २ फेब्रुवारी २०१८ रोजी धरण प्रकल्पात १९.१८ टीएमसी तर २ फेब्रुवारी २०१७ रोजी धरणांत १८.२० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या दोन वर्षात पुण्याच्या लोख संख्येत चांगलीच भर पडली आहे.जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पुण्याचे पाणी १३५० एमएलडी पेक्षा कमी केले जाणार नसल्याच्या असा निर्णय झाला असल्याचे नुकतेच स्पष्ट केले. त्यामुळे उन्हाळ्यात कालव्यातून शेतीसाठी सोडले जाणारे आवर्तन रद्द करावे लागणार आहे.परंतु,ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींकडून पिण्याच्या पाण्यासाठी मागणी करण्यात आली तर शेतीसाठी नाही. परंतु, पिण्यासाठी पाणी सोडावे लागणार आहे.त्यामुळे पाण्याचा वापर जपूनच करावा लागणार आहे.--------गेल्या सहा वर्षाचा ३ फेब्रुवारी रोजीचा खडकवासला धरणप्रकल्पातील पाणीसाठा (टीएमसी)वर्ष पाणीसाठा २०१९ १४.३३२०१८ १९.१८२०१७ १८.२०२०१६ १०.७७२०१५ १६.९५