केसनंदमध्ये ६ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, येथील ६६१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ६२७ रुग्ण बरे झाले आहेत. २४ रुग्ण सक्रिय आहे, तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. आव्हाळवाडीमध्ये एका कोरोना रुग्णाची वाढ झाली असून, येथील ६७६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ६४८ रुग्ण बरे झाले आहेत. २ रुग्ण सक्रिय आहे, तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोलवडी येथील ३३६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३२३ रुग्ण बरे झाले आहेत. ७ रुग्ण सक्रिय आहे, तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मांजरीखुर्दमध्ये २ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, येथील ४९९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४७४ रुग्ण बरे झाले आहेत. ३ रुग्ण सक्रिय आहे तर २२ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्याने वाघोली व वाघोली परिसरामध्ये लोकांची गर्दी वाढल्याचे पाहायला मिळत आहे, यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून लोकांनी काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या तरी प्रत्येक हॉस्पिटलमधील रुग्णसंख्या ही कमी झाली आहे.
----
कोरोणा रुग्णांची संख्या साठ टक्क्याने कमी झाली असून; सरकारने प्रत्येक हॉस्पिटलमध्येचे बिल चेक करत आहेत ते योग्य आहे. पण, मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करणारे डॉक्टर मोठ्या पगारावर असतात, तरी आपणांस माणसे वाचवने ती जगावयची ती व्यवस्थित ठेवणे आणि सरकारला व सर्वसामान्य मदत हे आपले कर्तव्ये आहे.
डॉ. रघुनाथ रामकर, अध्यक्ष, वाघोली डॉक्टर संघटना