शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

पुणे शहराच्या विकासासाठी सहा मिटरचे सर्व रस्ते नऊ मीटर करणे आवश्यक : महापालिका आयुक्त शेखर गायकवाड 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 8:58 PM

मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील ३२३ रस्ते नऊ मीटर करण्याच्या निर्णयाला दिली तत्वत: स्थगिती..

ठळक मुद्देवस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्य शासनाला पाठविलाटीडीआर खर्ची पडून नवीन बांधकामे सुरू होण्याबरोबरच पालिकेला आर्थिक उत्पन्नही सहा मीटर रस्त्यावर उंचच इमारती उभ्या राहिल्या तर वाहतुकीचा प्रश्न होऊ शकतो गंभीर

पुणे : शहरातील सहा मिटरचे सर्व रस्ते नऊ मीटर करणे आवश्यक असून यामुळे जुन्या इमारतींसह शहराच्या विकासाला चालना मिळेल. टीडीआर खर्ची पडून नवीन बांधकामे सुरू होण्याबरोबरच पालिकेला आर्थिक उत्पन्नही मिळेल. त्यामुळे शहराच्या विकासासाठी नऊ मीटर रस्ता होणेच योग्य असल्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल पुणे महापालिकेने शुक्रवारी राज्य शासनाला पाठविला.प्रशासनाने शहरातील ३२३ रस्ते नऊ मीटर करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. विरोधी पक्षांनी त्याला आक्षेप घेतल्यानंतर शहरातील सहा मिटरचे सर्वच रस्ते नऊ मीटर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. याविरुद्ध विरोधी पक्षांच्या खासदार, आमदार, गटनेते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली होती. यासंदर्भात मुंबईमध्ये पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालिकेच्या निर्णयाला तत्वत: स्थगिती देण्यात आली होती. तसेच सहा मीटर रस्त्यावर टीडीआर वापरास परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, याच बैठकीमध्ये याविषयासंबंधी वस्तुस्थितीदर्शक अहवाल पाठविण्याच्या सूचना महापालिकेला करण्यात आल्या होत्या.त्यानुसार, महापालिकेने शुक्रवारी अहवाल पाठविला. याबाबत पालिका आयुक्त म्हणाले, शहराचा विकास करावयाचा भूसंपादनासाठी रोखीने मोबदला न देता टीडीआर देणे स्थानिक स्वराज्य संस्थांना परवडते. पैसे खर्च न करता रस्त्यांचे रुंदीकरण करणे शक्य आहे. पूर्वी सहा मीटर रस्त्यांवर टीडीआर वापराला परवानगी होती. परंतु, शासनाने २०१६ साली त्याला मनाई केली. सहा मीटर रस्त्यापेक्षा नऊ मीटर रस्त्यावरच टीडीआरला परवानगी हवी. कारण, सहा मीटर रस्त्यावर उंचच इमारती उभ्या राहिल्या तर वाहतुकीचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. नियोजनबद्ध विकास होण्याऐवजी बकालपणा येण्याचीच अधिक शक्यता असते. हा बकालपणा येऊ द्यायचा नसल्यास पालिकेला रस्ते रुंदीकरणास परवानगी द्यावी असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.अनेक इमारतींच्या सुरक्षा भिंती रस्त्यालगत आहेत. या इमारती त्यांच्या भिंती तीन मीटर मागे घेऊ शकतात. त्या पटीमध्ये त्यांना टीडीआर आणि एफएसआय वापरता येऊ शकणार आहे. अनेक इमारती जुन्या आहेत. लिफ्ट नाही की अन्य सुविधा नाहीत अशा इमारतींचा पुनर्विकास होऊ शकतो. तसेच जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा मार्गही मोकळा होईल. ज्या इमारती रुंदीकरणासाठी जागा देतील त्यांना तात्काळ टीडीआर देण्यात आल्यास पुनर्विकास लवकर होऊ शकतो. विकासाच्या प्रक्रियेला चालना मिळेल. टीडीआर वापरला गेल्यास मोठी घरे बांधता येऊ शकतात असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.------------मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये रस्त्यांचे नऊ मीटर रुंदीकरण करण्यावरून चर्चा झाली होती. मिळालेल्या सूचनांनुसार वस्तुस्थितीदर्शक अहवाल पालिकेने शासनाला पाठविला आहे. विकासाला चालना देणे, मोठे आणि प्रशस्त रस्ते, जुन्या इमारतींचा पुनर्विकास आदींबाबत या अहवालात सविस्तर बाजू मांडण्यात आली आहे.- शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महापालिका

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAjit Pawarअजित पवारcommissionerआयुक्तBJPभाजपा