पुणे : लोणावळालोकलसाठी पोलिसांकडून देण्यात आलेले क्युआर कोड आधारित ई-पास दाखविल्यानंतरच प्रवासाचे तिकीट मिळणार आहे. मोबाईल किंवा स्थानकावरील मशीनद्वारे तिकीटाची सुविधा बंध असल्याने मार्गावरील प्रत्येक स्थानकावर तिकीट खिडकीमधूनच तिकीट घ्यावे लागणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
राज्य शासनाने लोकल सेवेसाठी हिरवा कंदील दाखविल्यानंतर येत्या सोमवार (दि. १२) पासून लोणावळा लोकल धावणार आहे. मात्र केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच या लोकलने प्रवास करता येणार आहे. पुणे व लोणावळ््यातून सकाळी व सायंकाळी प्रत्येकी एक लोकल सुटणार आहे. या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. पुणे पोलिसांकडून लोकलने प्रवास करू इच्छिणाºया कर्मचाºयांना क्युआरकोड आधारीत ई-पास दिले जाणार आहेत. हे पास दाखविल्यानंतर तिकीट खिडकीवर तिकीट दिले जाणार आहे. ई-पास असल्याशिवाय स्थानकावर प्रवेश दिला जाणार नाही, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लॉकडाऊनपुर्वी मोबाईलद्वारे लोकलचे तिकीट काढणे शक्य होत होते. तसेच स्थानकांवरही तिकीट मशीनद्वारे तिकीट घेण्याची सुविधा होती. पण आता निर्बंधांमुळे या दोन्ही सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिकीट खिडकीवरच तिकीट मिळणार आहेत. त्यासाठी स्थानकांवर पुरेशी व्यवस्था केली जाणार आहे. केवळ ई-पासच्या आधारे प्रवास करता येणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.---------------दौंड डेमु सेवा कधी?लोणावळा लोकलप्रमाणे पुणे-दौंड डेमु सेवाही सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. या भागातूनही पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये ये-जा करणारे अनेक नोकरदार, व्यावसायिक आहेत. त्यांचीही सध्या मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे लोकलप्रमाणे या मार्गावरही डेमु सेवा सुरू करावी, अशी मागणी दौंड-पुणे प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी केली आहे.----------