पुणो : विधानसभा निवडणुका, दिवाळीचा सण आणि लगीनसराई या सर्व गोष्टी एकापाठोपाठ आल्याने प्रिटिंग व्यावसाय तेजीत आहे. मात्र, पुणो शहरातील प्रिंटिंग व्यावसायिकांनी गेल्या काही दिवसांपासून लग्नपत्रिका छापून देण्याकडे लक्ष न देता निवडणूक लढविणा:या उमेदवारांच्या कामांना प्रथम प्राधान्य दिले.
मात्र, प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता लग्नपत्रिक आणि दिवाळी अंकांच्या छपाईला वेग आला आहे. त्यामुळे प्रिंटिंग व्यावसायिकांनी आधी लगीन उमेदवाराचे अशीच भूमिका घेऊन भरघोस कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.
पुणो जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा:या बहुतांश सर्वच उमेदवारांनी अप्पा बळवंत चौक परिसरातील प्रिंटिंग व्यावसायिकांकडून आपल्या पक्षांचे अहवाल, विविध माहिती पत्रके, वैयक्तिक अहवाल आदी माहिती छापून घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून प्रिंटिंग व्यवसाय तेजीत होता. परिणामी प्रिटिंग आणि डीटीपीचे काम करणारे कार्मचारी चांगलेच व्यस्त होते. परंतु, प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आता व्यावसायिकांनी लगAपत्रिका तयार करण्याचे आणि दिवाळी अंकाचे काम करण्यास सुरुवात केली आहे.
दिवाळीनंतर काही दिवसांनी लगAाचे मुहूर्त असले तरी लग्नाच्या तयारीचा एक भाग म्हणून एक महिनाभर आधीच लग्नपत्रिका छापून घेतल्या जातात. परंतु, निवडणूक लढविणारा उमेदवार मागेल तेवढे पैसे देत असल्यामुळे प्रिटिंग व्यासायिकांनी उमेदवारांच्या कामालाच पसंती दिली. त्यामुळे लग्नपत्रिकांची कामे मागे पडली. तसेच दिवाळी सण आठवडय़ावर आला असताना दिवाळी अंकही बाजारात दिसून येत नाहीत.
दिवाळी अंकांची कामेही निवडणुकीच्या कामांमुळे मागे पडली. त्यामुळे यंदा काही दिवाळी अंक वाचकांना हाती उशिरा पडणार आहेत. (प्रतिनिधी)
4लग्नपत्रिका छपाईची कामे निवडणुकीमुळे मागे पडली. त्यामुळे प्रत्येकाला आता लवकरात लवकर लग्नपत्रिका छापून हव्या आहेत. परिणामी लग्नपत्रिका छपाईचे दरही वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणो दिवाळी अंकांचे छपाईचे काम तात्काळ करून मिळावे यासाठीसुद्धा अधिक पैसे आकारले जाऊ शकतात.