ठळक मुद्देऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार
पुणे : पुणे महापालिकेच्या १८७ केंद्रांवर मंगळवारी प्रत्येकी २०० कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. मात्र कोव्हॅक्सिन लस दवखान्यात अथवा कुठल्याही केंद्रांवर मिळणार नाही.
उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १० टक्के लस ही ऑनलाइन बुकिंगव्दारे, तर १० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ४० टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (५ जुलैपूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाइन बुकिंगव्दारे तर ४० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.