तालुक्यातील सहकारी तत्त्वावरील उपपदार्थ निर्मिती असलेल्या या कारखान्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची निर्विवाद सत्ता आहे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली नाही. गुरुवारी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर भूमिका जाहीर करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोनच दिवस राहिले आहेत. आज ७० अर्ज वितरित होऊन केवळ एक नामनिर्देशन अर्ज दाखल झाला आहे. भिगवण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव यांनी अर्ज दाखल केला आहे.
त्यामुळे गुरुवार, शुक्रवार दोनच दिवस अर्ज दाखल करण्यासाठी राहिले आहेत. गुरुवारी पक्षीय भूमिका व निवडणुकीचे चित्र होईल. तालुक्यातील इंदापूर,कालठण, पळसदेव,भिगवण,शेळगाव या पाच गटामधून प्रत्येकी ३ संचालक, भटक्या जमाती प्रवर्ग १, मागास प्रवर्ग १, अनुसूचित जमाती १, महिला राखीव २ आणि ब वर्ग १ अशा एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.