पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी शिक्षण विभागाने यंदा २६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत मंजूर झालेली रक्कम खूप कमी आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने पूर्ण रक्कम शाळांना द्यावी, अशी मागणी शिक्षण संस्थाचालकांकडून केली जात आहे.आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्तीची तरतूद आहे. शुल्क प्रतिपूर्तीपोटी देय असलेल्या ८४ कोटी २ लाख निधीपैकी २६ कोटी इतका निधी शाळांना वितरित करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालकांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील अध्यादेश शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे सचिव राजेंद्र सिंग म्हणाले, आरटीईअंतर्गत २०१२ मध्ये सुमारे ५२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. त्यानंतर २०१३-१४, २०१४-१५ आणि २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात प्रत्येकी १ लाख विद्यार्थी प्रवेशित झाल्याचे दिसून येते. त्यामुळे गेल्या चार वर्षांत तब्बल ३.५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.मात्र, अनेक शाळांना शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम मिळाली नाही. काही ठराविक शाळांपर्यंतच शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वितरित झाली आहे. त्यामुळे शासनाने सर्व शाळांना वितरित करता येईल एवढ्या रकमेची तरतूद करावी.(प्रतिनिधी)
आरटीई शुल्क प्रतिपूर्तीसाठी केवळ २६ कोटी रुपये
By admin | Published: March 27, 2017 3:23 AM