शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
2
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
3
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
4
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
5
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
6
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
7
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
8
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
9
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
10
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
11
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
12
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
13
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
14
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
15
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
16
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
17
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
18
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
19
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
20
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण

अवघे बारामतीकर वारकऱ्यांच्या सेवेत

By admin | Published: June 25, 2017 4:28 AM

शहरात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाले. तरुण मंडळ, सामाजिक संस्थांनी विविध सेवाभावी उपक्रम राबविले.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : शहरात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाले. तरुण मंडळ, सामाजिक संस्थांनी विविध सेवाभावी उपक्रम राबविले.नगरपालिकेने पालखीचा मुक्काम असलेल्या शारदा प्रांगण, वारकऱ्यांच्या मुक्काम असलेल्या सांस्कृतिक भवन व नगरपरिषदेच्या शाळांमध्ये तसेच शहरात पाणी, वीज व स्वच्छतेची व्यवस्था केली होती. बारामती वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने राजगिरा चक्की व पौष्टिक लाडू वाटपाचा उपक्रम राबविला. संघटनेचे अध्यक्ष विजय सणस, उपाध्यक्ष फैय्याज शेख, लोकमतचे मुख्य वितरक राजेंद्र हगवणे प्रकाश उबाळे, प्रकाश शिंदे, प्रभाकर लाडगे, पांडुरंग हगवणे, मच्छिंद्र सायकर, शाम राऊत, केशव झगडे,माधव झगडे, सुनील वाघमारे, कुमार घाडगे, आप्पा घुमटकर, संतराम घुमटकर, सचिन सणस, बापूराव गायकवाड, फिरोज अली, बाळासाहेब पायगुडे, किशोर शिंदे, भोलेनाथ धाइंर्जे, युवराज घुमटकर, बशीर शेख, राजू शेख, सुतारमामा, विठ्ठल भिसे, रमेश दुधाळ, कांतीलाल बोरकर आदींसह वृत्तपत्र विक्रेत्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.मोता परीवार, अमृता गृप, जायंट्स गृप, जायंटस सहेली यांच्या वतीने वारकऱ्यांना भडंग वाटप करण्यात आले. नगरपरिषद कामगार पतसंस्थेच्या वतीने अन्नदानाचा उपक्रम राबविला. संस्थेचे चेअरमन सचिन शहा, व्हाईस चेअरमन महिबुब शेख, ज्येष्ठ संचालक राजेंद्र सोनवणे आदीं संचालकांनी सहभाग घेतला. भाग्यजय चॅरीटेबल ट्रस्ट व भाग्यजय हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य तपासणीचा उपक्रम राबविला. डॉ. आर. डी. वाबळे, डॉ. स्वाती वाबळे, डॉ. मिलींद ठोंबरे, डॉ. सुधीर कारंडे, डॉ. गणेश पन्हाळे, चंद्रकांत काकडे आदींनी सहभाग घेतला. खाटीक गल्लीतील अहिल्यादेवी अ‍ॅटोरिक्षा संघटनेच्यावतीने बिस्कीट व बटर वाटप केले. जवळपास ५ हजार बिस्किट पुडे व दोन हजार बटर यावेळी वारकऱ्यांना वाटप केले, अशी माहिती अध्यक्ष सुधीर खटके, विकास अडसुळ, संतोष जवारे यांनी दिली. स्वातंत्र्यसैनिक उद्धवराव इंगुले आरोग्य प्रतिष्ठानच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले. या वेळी डॉ. संजय बोंद्रे, डॉ. असिफ शेख, डॉ. अरविंद घुले, डॉ. कृष्णा बोंद्रे, शशिकांत बोंद्रे आदींनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला होता. बारामती मेडीकल असोसिएशन, शारदा हॉस्पिटल, डॉ. लक्ष्मण पोंदकुले, डॉ. नितीन काळे यांनी देखील मोफत आरोग्य तपासणी केली. उद्घाटन टेक्सटाईलस् पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. बारामती मंडप असोसिएशनच्या वतीने वेफर्स, बिस्कीट वाटप केले. येथील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक दिंडीला प्रथमोपचार पेटी व लोकमत अंकाचे वाटप केले. येथील आझाद रीक्षा संघटनेच्या वतीने इंदापुर चौकात चहा, कॉफी वाटप केले. निगडी प्राधिकरणच्या शिवतेज प्रतिष्ठानतर्फे सुरेश वाडकर, सुरेश ठोंबरे, अभिमन्यु काळोखे, रमेश आगवणे, दत्ता हगवणे, युवराज काळोखे, अरुण भालेराव यांनी २०० किलो राजगिरा लाडु वाटपाचा उपक्रम राबविला.