खोर : आगामी काळातील दौंड तालुक्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने करायची असेल, तर खडकवासला, मुळशी धरणाच्या पाण्याच्या संदर्भात योग्य पद्धतीने नियोजन पाहिजे. पाणी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे, ते दौंडला कशा प्रकारे आणता येईल याबाबत विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार राहुल कुल यांनी केले.
खोर (ता. दौंड) हरिबाचीवाडी येथील पद्मावती तलावात आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांतून जनाई-शिरसाईच्या टंचाई योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याचे जलपूजन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. आमदार राहुल कुल म्हणाले, की यावर्षी पुण्यासारख्या शहराला पाणीकपात करावी लागली आहे.
आपणालादेखील याबाबत काही नियोजन करावे लागले. आपण आणखी चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकलो नाही याची मला खंत आहे. पूर्वी शासनाकडे मागणी केली होती, की पावसाळ्यातील पाणी आम्हाला मोफत द्या, आणिडिसेंबर-जानेवारीत जे पाणी घेऊ त्याचे आम्ही पैसे भरू. परंतु, आता शासनाने हे सर्व माफ करून केवळ १९ टक्केच रक्कम शेतकऱ्याला भरावी लागणार आहे. उर्वरित ८१ टक्के रक्कम शासन भरणार आहे. त्यामुळे येथून पुढे जून-जुलैमध्ये पावसाळ्यातच मागणी केली तरच या भागामधील सर्व बंधारे हे भरले जाऊन याचा फायदा पुढील काळात होणार आहे.दौंड शहराला खडकवासला, मुळशी धरणांच्या पाण्याच्या संदर्भात बैठका चालू असून, पाण्याचे नियोजन चालू आहे. ’ सरपंच सुभाष चौधरी, डी. डी. बारवकर, दिलीप डोंबे, राजेंद्र डोंबे, विजय कुदळे, सुहास चौधरी, राहुल चौधरी, पांडुरंग डोंबे, भानुदास डोंबे, विकास चौधरी, नामदेव चौधरी, बाळासाहेब चौधरी, जालिंदर डोंबे, हनुमंत चौधरी, नाना चौधरी आदी उपस्थित होते.जि. प. व पं. स. सदस्यांनादेखील कामे सांगातुम्ही तुमच्या भागामधील जो जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून दिला आहे, त्या सदस्यालादेखील तुम्हाला विकासकामे मागण्याचा हक्क आहे. त्यालादेखील तुम्ही किती निधी आतापर्यंत खोरमध्ये आणला आहे हे विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे, असेही कुल यांनी सांगितले.