...तरच लाडकी बहीण योजना पुढे चालेल : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 10:05 AM2024-07-15T10:05:03+5:302024-07-15T10:06:00+5:30
विधानसभेचे फुंकले रणशिंग
बारामती (जि. पुणे) : मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेतून राज्यात महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. रक्षाबंधनाच्या काळात बँकेच्या खात्यावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. यात सातत्य टिकवायचे असेल तर विधानसभेतही महायुतीला निवडून द्या, तरच पुढे ही योजना चालेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले.
बारामती येथे आयोजित जनसन्मान महामेळाव्यात पवार बोलत होते.
आरक्षणावरून दंगे करणे हाच डाव : भुजबळ
मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. परंतु, काही लोक आपापसांत दंगे व्हावे, यासाठी प्रयत्न करत असल्याची टीका मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केली.
आरक्षणप्रश्नी सरकारने नुकतीच सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी येणे क्रमप्राप्त होते; पण बारामतीमधून कोणाचा तरी फोन गेला. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला, असा टोला भुजबळ यांनी लगावला.