शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे हातच इतिहास घडवतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:11 AM

साध्वी ऋतुंभराजी : राममंदिर ते राष्ट्र मंदिर अशा श्रद्धानिधी जनजागर अभियानानिमित्त जाहीर सभा लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संकल्पासमोर ...

साध्वी ऋतुंभराजी : राममंदिर ते राष्ट्र मंदिर अशा श्रद्धानिधी जनजागर अभियानानिमित्त जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : संकल्पासमोर विकल्प नसेल तर संकल्प नक्की सिद्धीस जातो. आपल्या पूर्वजांनी राष्ट्रनिर्माणासाठी संघर्ष केला. तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या विखारी वृत्तीने राममंदिराच्या चळवळीची थट्टा केली. आस्थांचा उपहास केला गेला. अशा वृत्तीला विरोध करण्याचे सामर्थ्य आपल्यात हवे. भविष्यात मंदिर उध्वस्त करण्याचे स्वप्नही कोणी पाहू शकणार नाही, अशा शब्दांत साध्वी ऋतुंभरा यांनी आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे हात इतिहास घडवतात, हेही त्यांनी अधोरेखित केले.

राममंदिर ते राष्ट्र मंदिर अशा श्रद्धानिधी जनजागर अभियानानिमित्त रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे साध्वी ऋतुंभरा यांची जाहीर सभा पार पडली.'' सियावर रामचंद्र की जय, ''पवनसुत हनुमान की जय''

''जय श्रीराम'' अशा जयघोषाने परिसर दुमदुमला होता. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या येथील भव्य मंदिर निर्माण श्रद्धानिधी अभियानानिमित्त ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, रवींद्र वंजारवाडकर, ह.भ.प. शिवाजी मोरे, पांडुरंग राऊत, संजय मुद्राळे, तुषार कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. अभियानप्रमुख तुषार कुलकर्णी यांनी राममंदिराच्या ऐतिहासिक लढ्यावर प्रकाश टाकला.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, ''राम मंदिर निर्माणाची चळवळ ही अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन झाले. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर राममंदिर उभे राहत आहे.''

साध्वी ऋतुंभरा यांनी ''भारत माता की जय, अखंड भारत की जय'' च्या घोषणेने सुरुवात केली.

त्या म्हणाल्या, ''कोणत्याही गोष्टीत सातत्य खूप महत्वाचे असते. आपल्या पूर्वजांनी प्राणांच्या वातीने संघर्षाचा दिवा अखंड तेवत ठेवला. आपण राजनैतिक गुलामी सहन केली, मात्र मनातील आशावाद संपू दिला नाही, शत्रूचे तळवे चाटले नाहीत. पूर्वजांचे शौर्य आणि धैर्यामुळे आपल्याला हे यश पहायला मिळाले आहे.

आताच्या शिक्षणातून आपल्या मुलांना स्वाभिमान शिकता येईल का, असा प्रश्न आहे. मुलांना आंतरिक शक्ती देण्याचे काम पालकांचे आहे. मुलांवर स्वाभिमानाचे, राष्ट्रनिर्माणाचे संस्कार मातृशक्तीने केले पाहिजेत.''

-----

राष्ट्र आस्थेच्या प्रवाहाने चालते

देश निश्चित सीमांमध्ये बांधलेला आहे. देश राजशक्तीने चालतो, मात्र राष्ट्र आस्थेच्या प्रवाहाने चालते. हिंदूंच्या आस्थेची कायम खिल्ली उडवली गेली. वेब सिरीजमधून आस्थांचा उपहास केला जातो. चित्रपट, मालिकांमधून आपला निश्चय मोडण्याचा प्रयत्न केला जातो, थट्टा केली जाते. मात्र, आपला निश्चय इतका तकलादू नाही. सत्य सुर्यासारखे प्रकाशमान असते. ते कोणीच झाकू शकत नाही. मध्ययुगातील वाईट काळ परत येणार नाही, याची व्यवस्था आपण करायला हवी, असे साध्वी ऋतुंभरा म्हणाल्या.