शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जेजुरीगडावरील मुख्य मंदिरात केवळ त्रिकाल पूजाच

By admin | Published: May 03, 2016 3:24 AM

जेजुरीगडावरील मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातील स्वयंभू लिंगावर येथून पुढे फक्त त्रिकाल पूजाच करण्याचे आदेश पुणे विभागीय धर्मादाय सहआयुक्त एस. जी. डिगे यांनी मार्तंडदेव संस्थानाला दिले

जेजुरी : जेजुरीगडावरील मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातील स्वयंभू लिंगावर येथून पुढे फक्त त्रिकाल पूजाच करण्याचे आदेश पुणे विभागीय धर्मादाय सहआयुक्त एस. जी. डिगे यांनी मार्तंडदेव संस्थानाला दिले आहेत. इतर पूजा व अभिषेक गडकोटातील पंचलिंग महादेव मंदिरात केल्या जाव्यात, असेही त्यांनी आदेशात सुचवले आहे. श्री मार्तंड देव संस्थानच्या विश्वस्तांची देव संस्थानच्या समस्याबाबत व भाविकांना मिळणाऱ्या सुविधाबाबत चर्चा करण्यासाठी नुकतीच पुणे विभागीय धर्मादाय आयुक्त कार्यालयात एक बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी गडकोटातील मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातील स्वयंभू महादेवाच्या लिंगावर व श्री मार्तंड देवाच्या पायावर काही ठराविक वेळेव्यतिरिक्त दिवसभरात जलाभिषेक व विविध पूजा-अर्चा केल्या जातात. यामुळे गाभाऱ्यात सततची मोठी गर्दी राहते. स्वयंभू लिंगावर सततचा जलाभिषेक व पूजा-अर्चा होत असल्याने लिंगाची झीज होण्याचा संभव आहे. यामुळेच देव संस्थानने गाभाऱ्यातील त्रिकाल पूजा-अर्चाव्यतिरिक्त इतर वेळी होणाऱ्या पूजा, अभिषेक पंचलिंग महादेव मंदिरात कराव्यात, असे आदेश विश्वस्त मंडळाला दिले आहेत. यामुळे लिंगाची झीज होणार नाही, तसेच गाभाऱ्यातील गर्दीही कमी होऊन भाविकांना देवदर्शन सुलभ होईल. त्याचबरोबर विश्वस्त मंडळाने यापुढे शनिवार, रविवार व यात्रा कालावधीत भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था गाभाऱ्याच्या बाहेरून करावी, गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश देऊ नयेत, असेही निर्देश देण्यात आलेले आहेत. (वार्ताहर)मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात पहाटे ५ ते सकाळी ६, दुपारी १२.३० ते १.३० व रात्री ९ ते १० याच वेळांत स्वयंभू महादेवाच्या लिंगाची व मार्तंडदेवाची पूजा करण्याचे निर्देश दिले आहेत. या त्रिकाल पूजेच्या वेळी मानकरी, गावकरी व विश्वस्त मंडळाने किंवा व्यवस्थापकाने सुचवलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच गाभाऱ्यात जाण्याची परवानगी असून, हक्कादारांतर्फे प्रत्येकी एक व्यक्तीच देवाच्या सेवेसाठी गाभाऱ्यात उपस्थित राहू शकणार आहेत. तसेच जे आठवड्याचे मानकरी असतील त्यांच्यासमवेत केवळ पाच व्यक्तींनाच प्रवेश दिला जावा, असेही धर्मादाय सहआयुक्तांनी आदेश दिलेले आहेत.