पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (सीबीएसई) सहायक प्राध्यापकपदासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (यूजीसी नेट) आता तीनऐवजी ३०० गुणांचे दोनच पेपर घेतले जाणार आहेत. ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठीची वयाची अटही दोन वर्षांनी शिथिल करण्यात आल्याचे परिपत्रक सीबीएसईकडून जाहीर करण्यात आली आहे.नव्या नियमानुसार नेटची परीक्षा ८ जुलै २०१८ रोजी होणार आहे. ६ मार्च ते ५ एप्रिल २०१८ आॅनलाइन फॉर्म भरता येणार आहेत.नेट परीक्षेत सीबीएसईकडून काही मूलभूत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षा आता ३५० ऐवजी ३०० गुणांची असणार आहे. तसेच पूर्वी असणा-या तीन पेपरऐवजी आता दोनच पेपर असणार असून पहिला पेपर ५० प्रश्न व दुसरा पेपर १०० प्रश्न प्रत्येकी २ गुण, असे एकूण ३०० गुणांची परीक्षा होणार आहे.परीक्षेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. १०० गुणांच्या (५० प्रश्न) पहिल्या पेपरसाठी १ तासाचा अवधी असणार आहे. तो सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत घेतला जाईल, तर दुस-या २०० गुणांच्या (१०० प्रश्न) पेपरसाठी दोनच तास वेळ असणार आहे. तो दुपारी ११ ते १ या वेळेत घेतला जाईल. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य असणार आहेत.ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठीच्या वयाच्या अटीत बदललेल्या नियमांनुसार दोन वर्षांची वाढ करण्यात आली आहे. खुल्या गटासाठी ३० वर्षांपर्यंत, तर मागास प्रवर्गासाठी ३५ वर्षे वयापर्यंत फेलोशिपसाठी अर्ज करता येणार आहेत.नेट परीक्षेचे वेळापत्रक-आॅनलाइन फॉर्म भरणे६ मार्च २०१८फॉर्म भरण्याची अंतिम मुदत५ एप्रिल २०१८चलन भरण्याची अंतिम मुदत६ एप्रिल २०१८यूजीसी नेट परीक्षा८ जुलै २०१८
नेट परीक्षेसाठी तीनऐवजी दोनच पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 5:54 AM