सरपंच पदी गीता नितीन पानसरे व उपसरपंचपदी
प्रेमानंद जयसिंग अस्वार यांची निवड झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण झांजे यांनी दिली.
सरपंच पदासाठी गीता नितीन पानसरे व शकुंतला बाबाजी डुंबरे यांनी अर्ज दाखल केले होते. उपसरपंच पदासाठी प्रेमानंद जयसिंग अस्वार व आशिष शामकुमार शहा यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु अर्ज माघारीच्यावेळी शकुंतला डुंबरे व आशिष शहा यांनी अर्ज मागे घेतल्याने सरपंच पदी गीता पानसरे व प्रेमानंद अस्वार यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी जेष्ठ सदस्य दिलीप डुंबरे, शकुंतला डुंबरे, आशिष शहा, वनिता बटवाल, रंजना डुंबरे, रंजना वाकर, शोभा ढमाले, आशिष गोंदके, मनीषा वारे, छाया तांबे वैशाली ताजवे, गोरक्षनाथ फापाळे, मयुरी खंडागळे ,प्रशांत डुंबरे हे सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर जि.प.सदस्य मोहीत ढमाले, पं. स. सभापती विशाल तांबे, संभाजी तांबे, अनिलशेठ तांबे, गोविंदराव तांबे, माजी सरपंच संतोष तांबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संंचालक संतोष तांबे, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, जयप्रकाश डुंबरे, चंद्रकांत डुंबरे, डॉ जी. एम. डुंबरे, तुषार थोरात, मारुती पानसरे, सीताराम ढमाले, सुदाम ढमाले, रज्जाक इनामदार आदींनी अभिनंदन केले.
--
फोटो : ०९ओतूर सरपंचपदी नियुक्ती केल्यानंतर सत्कार करताना सदस्य