शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

पवनाथडी जत्रेचे उद्घाटन : मनोरंजन, खाद्यपदार्थांची मेजवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 2:39 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावरील पवनाथडी जत्रेस आजपासून सुरुवात झाली. लोककलांचा आविष्कार आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच सखींचे मनोरंजनही करण्यात आले.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावरील पवनाथडी जत्रेस आजपासून सुरुवात झाली. लोककलांचा आविष्कार आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच सखींचे मनोरंजनही करण्यात आले. गृहोपयोगी वस्तूंना बाजारपेठ मिळण्याबरोबरच खाद्य महोत्सवातून खवैयांना मेजवानी मिळाली. स्त्रियांचे बचत गट कर्जाची परतफेड १०० टक्के करतात. म्हणून सरकारचा त्यांच्यावर विश्वास असल्याने शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत अ‍ॅक्सिस बँकेच्या सहयोगी उपाध्यक्षा अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारपासून जत्रेची सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीष बापट उपस्थित होते. व्यासपीठावर महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाल्या, ‘‘महिलांमध्ये बुद्धिकौशल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. परंतु त्यांना योग्य संधी मिळत नाही. मात्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली असून, महिलांच्या कलागुणांना व कौशल्याला वाव दिला आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात उत्तम प्रकारच्या मॅनेजर आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गरजू महिलांना मदत करण्यातच जीवनाचे खरे सार्थक आहे. स्टार्ट अपमध्ये पुणे जिल्हा बंगलोरनंतर दुसºया क्रमांकावर आहे. महाराष्ट्रासह भारत सुपर पॉवर होणार आहे.’’सूत्रसंचालन सहायक आयुक्त अण्णा बोदडे व संदीप साकोरे यांनी केले. आयुक्त हर्डीकर यांनी आभार मानले.पवनाथडी जत्रा या उपक्रमामध्ये बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून महापालिकेने स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. समाजाच्या विविध क्षेत्रांतील वेगवेगळे उद्योग, नवनवीन कल्पना यांचा समावेश होऊन त्याचा फायदा बचत गटांना होत आहे. राज्य सरकार आणि समाजदेखील महिलांच्या सबलीकरणास प्राधान्य देत आहे. महिलांमध्ये निसर्गत: कौशल्य असते. त्याचा फायदा या सगळ्यांच्या माध्यमातून समाजाला होत आहे.- गिरीश बापट, पालकमंत्री

टॅग्स :Puneपुणे