पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे आणि इतर आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. मात्र राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून गांधीजीबद्दल विकृत शेरेबाजी करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न माऊली भगवती प्रॉडक्शन मोरया निर्मित ‘हे राम....नथुराम’ या नाटकामधून करण्यात येत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या नाटकाच्या विरोधात भरत नाट्यमंदिर येथे रविवारी निदर्शने करण्यात आली.या नाटकाच्या सादरीकरणाला कायदेशीर प्रतिबंध करावा व नाटक निर्माते, कलावंत यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना दिले असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ता विकास लवांडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘हे राम...नथुराम’ नाटकास विरोध
By admin | Published: December 26, 2016 3:35 AM