विरोधकांनी भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या; 'भुजबळ नाराज' चर्चेला अजितदादांकडून पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 02:43 PM2024-06-14T14:43:21+5:302024-06-14T14:44:42+5:30

लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी माघार घेणारे भुजबळ राज्यसभेवर निवड न झाल्याने नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या

Opponents planted reports that chagan bhujbal was upset Ajit pawar put an end to the chagan bhujbal angry discussion | विरोधकांनी भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या; 'भुजबळ नाराज' चर्चेला अजितदादांकडून पूर्णविराम

विरोधकांनी भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या; 'भुजबळ नाराज' चर्चेला अजितदादांकडून पूर्णविराम

पुणे: लोकसभा निवडणुकीदरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेत आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी आता निवडणुकीतून माघार का घेतली याचे कारणही सांगितले होते. दिल्लीतून माझे तिकीट फायनल ही झाले होते. मात्र महिना झाला तरी जाहीर होत नव्हते. समोरचा उमेदवार मात्र महिनाभरापासून कामाला लागला होता. त्यामुळे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले होते. त्यानंतर भुजबळ राज्यसभेवर जातील अशा चर्चा ही मागील काही दिवसांपासून रंगल्या होत्या. मात्र या चर्चा देखील फुल ठरल्या असून राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. राज्यसभेवर निवड न झाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या (Chagan Bhujbal Was Upset). याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) विचारले असता त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 

प्रफुल पटेल (Praful Patel), सुनील तटकरे (Sunil Tatkare) कोणीही मंत्रिपदाबाबत नाराज नाहीत. तसेच राज्यसभेच्या खासदारकीबाबत भुजबळ नाराज नसल्याचे पवारांनी स्पष्ट सांगितले.  विरोधकांनी आणि जवळच्या मित्रांनी भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या आहेत. असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विधानभवन येथे झालेल्या या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्यादृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करुन गतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  या स्मारकाच्या कामाचे भुमिपुजन  जुलैमध्ये  होणार आहे. या स्मारकाचा आराखडा तयार केला आहे. या ठिकाणी शाळा होणार नाही. पण तेथे मुलीसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू केले जातील असे अजित पवार यांनी सांगितले.

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या कामाचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा 
 
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे पुणे शहरात संगमवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकाच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला.  त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले या स्मारकाचे काम सुरू झाले आहे.  स्मारकांच्या पायांतर्गत सुरू असलेले पायलिंगचे काम जुलैच्या सुरुवातीपर्यंत पूर्ण केले जाईल. या स्मारकाच्या जागेसाठी ८५ कोटी रूपये दिले आहे. पण आता ही जागा आमची आहे असे पत्र कोणीतरी दिले आहे. त्याबाबत सर्च घेण्यास सांगितले आहे. या जागेची किमंत राज्यसरकार देणार आहे. स्मारक पालिका उभे करणार आहे. या स्मारकासाठी जागेच्या अनुषंगाने काही अडचणी असल्यास जागेची मोजणी तात्काळ करुन घ्यावी. जागेसंबंधी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यास महानगरपालिकेने चांगल्यात चांगले वकील नेमावे. त्यासाठी वेळप्रसंगी राज्याचे महाधिवक्ता यांचीही मदत उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले.  

Web Title: Opponents planted reports that chagan bhujbal was upset Ajit pawar put an end to the chagan bhujbal angry discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.