शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

विरोधकांनी भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या; 'भुजबळ नाराज' चर्चेला अजितदादांकडून पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 14:44 IST

लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी माघार घेणारे भुजबळ राज्यसभेवर निवड न झाल्याने नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या

पुणे: लोकसभा निवडणुकीदरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेत आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी आता निवडणुकीतून माघार का घेतली याचे कारणही सांगितले होते. दिल्लीतून माझे तिकीट फायनल ही झाले होते. मात्र महिना झाला तरी जाहीर होत नव्हते. समोरचा उमेदवार मात्र महिनाभरापासून कामाला लागला होता. त्यामुळे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले होते. त्यानंतर भुजबळ राज्यसभेवर जातील अशा चर्चा ही मागील काही दिवसांपासून रंगल्या होत्या. मात्र या चर्चा देखील फुल ठरल्या असून राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. राज्यसभेवर निवड न झाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या (Chagan Bhujbal Was Upset). याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) विचारले असता त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 

प्रफुल पटेल (Praful Patel), सुनील तटकरे (Sunil Tatkare) कोणीही मंत्रिपदाबाबत नाराज नाहीत. तसेच राज्यसभेच्या खासदारकीबाबत भुजबळ नाराज नसल्याचे पवारांनी स्पष्ट सांगितले.  विरोधकांनी आणि जवळच्या मित्रांनी भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या आहेत. असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विधानभवन येथे झालेल्या या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्यादृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करुन गतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  या स्मारकाच्या कामाचे भुमिपुजन  जुलैमध्ये  होणार आहे. या स्मारकाचा आराखडा तयार केला आहे. या ठिकाणी शाळा होणार नाही. पण तेथे मुलीसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू केले जातील असे अजित पवार यांनी सांगितले.

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या कामाचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा  आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे पुणे शहरात संगमवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकाच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला.  त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले या स्मारकाचे काम सुरू झाले आहे.  स्मारकांच्या पायांतर्गत सुरू असलेले पायलिंगचे काम जुलैच्या सुरुवातीपर्यंत पूर्ण केले जाईल. या स्मारकाच्या जागेसाठी ८५ कोटी रूपये दिले आहे. पण आता ही जागा आमची आहे असे पत्र कोणीतरी दिले आहे. त्याबाबत सर्च घेण्यास सांगितले आहे. या जागेची किमंत राज्यसरकार देणार आहे. स्मारक पालिका उभे करणार आहे. या स्मारकासाठी जागेच्या अनुषंगाने काही अडचणी असल्यास जागेची मोजणी तात्काळ करुन घ्यावी. जागेसंबंधी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यास महानगरपालिकेने चांगल्यात चांगले वकील नेमावे. त्यासाठी वेळप्रसंगी राज्याचे महाधिवक्ता यांचीही मदत उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेChagan Bhujbalछगन भुजबळAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSunetra Pawarसुनेत्रा पवार