भारतीय पुरातत्त्व संशोधनाच्या पद्धतीस आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, देशभरातील पुरातत्त्वीय स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केली जात आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात संग्रहालय असावे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे जुन्या वास्तूंचे व्यवस्थापन व संवर्धन करण्याचा कल वाढत चालला आहे. महाराष्ट्रासह देशभरात सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरातत्त्व क्षेत्रात करिअरच्या संधी वाढतायेत, असे डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे डेक्कन कॉलेजने १९६८मध्ये उत्खननाचे काम हाती घेतले होते. पुढे पुरातत्त्व अभ्यासक एम. के. ढवळीकर यांनी उत्खननाच्या क्षेत्रातील नवीन संकल्पनांच्या आधारे येथे काम सुरू केले, असे नमूद करून डॉ. वसंत शिंदे म्हणाले, महाराष्ट्रातील आद्य शेतकºयांचे ठिकाण म्हणून इनामगावकडे पाहिले जाते. डोळ्यांनी न दिसणाºया कणांचा व जळालेल्या धान्यांचा आणि लहान मण्यांचा अभ्यास करण्यासाठी नवीन तंत्र वापरण्यात आले. उत्खननात मिळालेल्या वस्तूंचा तेथील स्थळाशी असणारा संबंध तपासण्यात आला. पूर्वी सुमारे ३५0 वर्षांपूर्वीच्या काळातील पुरावे मिळत नाहीत, अशी धारणा होती. मात्र, इनामगाव येथील शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेल्या संशोधनामुळे ही धारणा चुकीची ठरली. आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने केलेल्या संशोधनामुळे भूशास्त्रज्ञांकडून जमिनीचा उतार, हवामानाची स्थिती समजू शकली. या संशोधनासाठी वनस्पतिशास्त्राचा समावेश प्रथमच करण्यात आला. त्यामुळे जळालेल्या धान्याच्या कणांचा व आद्य शेतकºयांच्या शेती पद्धतीचा अभ्यास तसेच प्राण्यांचा आहार यांसह रसायनशास्त्राच्या आधारे अनेक गोष्टींचा अभ्यास करता आला. त्यामुळे हे उत्खनन आधुनिक उत्खननाचे उत्कृष्ट उदाहरण ठरले.शिंदे म्हणाले, गुजरात मधील पादरी या ठिकाणी हडप्पन लोकांचा काळ इ.स. २ हजार ५00 असल्याचा समज होता. मात्र, या उत्खननात सिंधू संस्कृतीचा इ.स.पूर्व 4000 मागे जाणारा काळ शोधून काढला. त्याचप्रमाणे राजस्थानमधील मेवाड या ठिकाणी शेतीची सुरुवात बाहेरील लोकांनी येऊन केली अशी धारणा होती. मात्र, प्राप्त पुराव्यांवरून भटकंती करून शिकार करण्याची अवस्था होती तेव्हापासून शेतीस सुरुवात झाली असे दिसून आले, त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात व देशाबाहेर पुरातत्त्व क्षेत्रात महत्त्वाचे काम सुरू आहे.सध्या पुरातत्त्व अभ्यासाविषयी असणारे गैरसमज दूर करण्याचे काम सुरू असून, या विषयाचा अभ्यास का करावा, याचा प्रचार- प्रसार केला जात आहे. देशाची प्रगती करण्यासाठी देशाचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.महाराष्ट्रासह देशभरात अनेक महत्त्वाची पुरातत्त्व स्थळे आहेत. राज्य व केंद्र शासनाकडून ही स्थळे पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच प्रत्येकाने आपल्या संस्कृतीच्या वारश्याचे जतन केले पाहिजे. केवळ केंद्र किंवा राज्य शासन अथवा एखादे विद्यापीठ पुरातन ठेव्यांचे जतन करू शकत नाही. स्थानिक लोकांना या कामात सामावून घेतल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. त्यामुळे डेक्कन कॉलेजच्या वतीने केल्या जाणाºया प्रत्येक उत्खननाच्या ठिकाणी राहणाºया नागरिकांचेप्रबोधन करतो, असेही त्यांनीसांगितले. उत्खननाच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण काम करणाºयांना महाराष्ट्रासह देशभरात निधीची कमतरता नाही. प्रत्यकाला या संदर्भातील संशोधन प्रस्ताव सादर करता येतात. शासनाकडे निधी आहे, मात्र योग्य विषयातील संशोधनालाहा निधी दिला जातो; मात्र योग्य संशोधक पुढे येत नाहीत.महाराष्ट्रासह देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये पुरातत्त्वविषयक अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे डेक्कन कॉलेजमधील विद्यार्थी आता प्राध्यापक म्हणून अनेक ठिकाणी रुजू होत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी वाढत चालल्या आहेत, असेही शिंदे यांनी नमूद केले.
पुरातत्त्व क्षेत्रात वाढताहेत करिअरच्या संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 2:28 AM