पिंपरी : राजकीय पक्षांकडून पराभूत झालेल्या किंवा निवडून न येऊ शकणाऱ्या कार्यकर्त्यांना मागच्या दाराने स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेच्या सभागृहात आणण्याच्या परंपरेस यंदा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. नवीन नियमावली व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाच वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर, निवृत्त प्राध्यापक, प्राचार्य, वकील, इंजिनिअर, निवृत्त अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांपैकीच स्वीकृत सदस्य म्हणून निवड करता येणार आहे.महापालिकेमध्ये संख्याबळानुसार ५ स्वीकृत नगरसेवकांची निवड सभागृहामध्ये करता येणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा व अनुभवाचा महापालिकेला फायदा व्हावा या हेतूने स्वीकृत नगरसेवकपदाची तरतूद करण्यात आलेली होती. मात्र राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठीच स्वीकृत नगरसेवकपदाचा वापर आतापर्यंत केला जात आहे. (प्रतिनिधी)
स्वीकृत नगरसेवकपदी डॉक्टर, इंजिनिअरला संधी
By admin | Published: March 17, 2017 2:15 AM