शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

बीडीपीवर मिळणार बांधकामाला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 1:02 AM

शहराच्या बीडीपी (बायो डायव्हर्सिटी पार्क-जैवविविधता उद्यान) क्षेत्रावरील बांधकामांसंबधीचा राज्य सरकार स्तरावर नव्याने काही निर्णय होण्याची शक्यता बळावली आहे.

पुणे : शहराच्या बीडीपी (बायो डायव्हर्सिटी पार्क-जैवविविधता उद्यान) क्षेत्रावरील बांधकामांसंबधीचा राज्य सरकार स्तरावर नव्याने काही निर्णय होण्याची शक्यता बळावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच आदेशावरून महापालिकेतील सर्व पदाधिकारी, विरोधी पक्षनेते, गटनेते, आमदार, खासदार यांची या विषयावर विस्तृत बैठक होत आहे. त्यातील निर्णयाची माहिती मुख्यमंत्री घेणार असून त्यानंतर ते शहरातील बीडीपी क्षेत्राबाबत नव्याने काही धोरण जाहीर करतील, असे दिसते.मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून ही बैठक होत असल्याची माहिती महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनीच दिली. बीडीपी क्षेत्रात कसलेही बांधकाम करता येणार नाही, असा कायदाच २०१५मध्ये मुख्यमंत्र्यांनीच केला होता. त्या वेळी त्याला बराच विरोध झाला, खुद्द भाजपाचेच अनेक पदाधिकारी त्याच्या विरोधात होते; मात्र वारंवार मागणी करूनही मुख्यमंत्र्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. आता मुख्य- मंत्र्यांनीच पुण्यातील लोकप्रतिनिधींनी यावर निर्णय घ्यावा, असे सांगितले आहे. त्यावरून या धोरणात बदल केला जाण्याची चिन्हे आहेत. सध्या या क्षेत्रावर काहीही बांधकाम करता येत नाही; मात्र तेथील जागामालकांनी किमान १० टक्के बांधकामांची परवानगी मागितली आहे. ४ टक्के बांधकाम करू द्यावे, असा सूर होता. मात्र, त्यालाही मुख्यमंत्र्यांचा नकार होता. पण, आता पुन्हा सरकारी स्तरावरच बदल होण्याचे चिन्ह आहे.>शहरात एकूण ९७८ हेक्टर क्षेत्र बीडीपीमध्ये आहेत. त्यातील १२४ हेक्टर जमीन सरकारी मालकीची आहे. खासगी मालकांनी मोठ्या प्रमाणावर नुकसानभरपाई मागितली आहे किंवा बांधकामाला परवानगी देण्याची मागणी केली. खासदार वंदना चव्हाण यांनी बीडीपी क्षेत्रावर बांधकामाला परवानगी देण्यास तीव्र विरोध केला आहे.

टॅग्स :Puneपुणे