शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

निवडणुकीत तरुणांना संधी, सहाचे ६० करू; शरद पवार यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 5:15 AM

'त्या सर्वांना पराभवाचा सामना करावा लागला होता.'

पुणे : विधानसभा निवडणुकीत तरुणांना अधिक संधी दिली जाणार आहे. आम्ही नव्याने तसेच ताकदीने पुन्हा पक्ष उभा करू. ६ आमदारांचे ६० आमदार आम्ही केले होते. आतादेखील त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. सध्या आघाडीमध्ये ज्या पक्षांतरच्या घटना घडत आहेत, त्यात सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून सत्तेचा गैरवापर होत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी भाजप आणि सेनेवर टीका केली.पवार म्हणाले, मागील काही महिन्यांत आघाडीमधील काही नेते मंडळी सत्ताधारी भाजप आणि सेनेत जाताना दिसत आहेत.१९८० सालीही अशीच परिस्थिती झाली होती. त्यावेळी जे सत्ताधारी पक्षात गेले होते. त्या सर्वांना पराभवाचा सामना करावा लागला होता. कर्नाटकमध्ये भाजपने सत्तेचा गैरवापर करूनच सत्ता मिळविली आहे. हा सर्व प्रकार तेथील आणि देशभरातील जनतेने पाहिला आहे.पवार म्हणाले, पक्षातून गेले त्याबद्दल काही चिंता वाटत नाही. त्यांना उत्तर कसे द्यायचे हे आम्हाला चांगले माहीत आहे. ज्यांचे तिकीट निश्चित आहे त्यांनी नाही आले तरी चालेल असे सांगितले असल्याचे सातारा व सोलापूरचे नाव घेऊन सांगितले.तुमची ईडी आणि अन्य काही विभागामार्फत चौकशी लावू असे आघाडीतील काही नेत्यांना सांगण्यात येत असल्याचे ऐकण्यात आले आहे. अशा प्रकाराच्या दबाव तंत्रामुळे आघाडी मधील नेत्यांना भाजप आणि सेना ओढून घेत आहे. अशाप्रकारे सत्तेचा गैरवापर केल्याचे मी कधीही पाहिलेले नाही, अश्ी टीका पवार यांनी केली.

भाकड गायी गेल्याने फरक पडणार नाही - जयंत पाटीलचौकशीच्या, तुरूंगांच्या धमक्या देत भारतीय जनता पार्टी राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण करत आहे. त्याचा लाभ होणार असेल तर तो त्यांनाच लखलाभ, मात्र भाकड गायी गेल्या तर आम्हाला काही फरक पडणार नाही, आम्ही नव्या दमाच्या नेत्यांना संधी देऊन पुन्हा उभारी घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. भाजपचे दोन आमदार त्यांचा पक्ष सोडणार असून त्यांची नावे योग्य वेळी जाहीर करू, असे ते म्हणाले.आयुष्यभर शरद पवार यांच्या उपकाराखाली राहायचे. आमदार, मंत्री म्हणून पदे भोगायची आणि पक्षाच्या अडचणीच्या काळात त्यांना सोडून जायचे हे योग्य नसून, जहाज बुडताना पहिल्यांदा उंदीर उड्या मारतात, बिकट कालावधीतून पक्ष उभारी घेईल अशी आशा आहे.-आमदार हसन मुश्रीफप्रदेश उपाध्यक्ष, राष्टÑवादी कॉँग्रेस.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस