शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

चाकण हद्दवाढीला विरोध

By admin | Published: January 30, 2016 3:57 AM

चाकण नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगर परिषदेच्या हद्दवाढीचा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. याबाबत, या हद्दवाढीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित

आंबेठाण : चाकण नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगर परिषदेच्या हद्दवाढीचा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. याबाबत, या हद्दवाढीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित असणाऱ्या गावांमधून चाकण नगर परिषदेच्या या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. नगर परिषद हद्दीत जायचे की नाही, याबाबत आमचा निर्णय आम्हाला घेऊ द्या, असा सूर उमटत आहे. त्यामुळे हद्दवाढीचा निर्णय म्हणजे, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, असाच झाला आहे.चाकण शहराला सेवा पुरविण्याचे सोडून, नगर परिषद अजून गावे समाविष्ट करून काय साध्य करणार आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नगर परिषदेने आधी शहराचे प्रलंबित प्रश्न सोडवावे; मगच आमच्या समावेशाचा विचार करावा, असा स्पष्ट इशारा या गावांनी दिला आहे.चाकण नगर परिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीमध्ये मेदनकरवाडी, कडाचीवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी, कुरुळी, चिंबळी, मोई, निघोजे, महाळुंगे, खालुंब्रे, आंबेठाण, बिरदवडी, गोनवडी, पिंपरी खुर्द, रोहकल, वाकी खुर्द या गावांचा समावेश करावा, असा ठराव चाकण नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला; परंतु या गावांमध्ये नगर परिषदेच्या या निर्णयाविरोधात संतापाची तीव्र लाट असून, याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा या गावांच्या लोकप्रतिनिधींनी दिला आहे. त्यासाठी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत याला विरोध करून तसे ठरावदेखील करण्यात आले आहे. आमच्या ग्रामपंचायती या गावांना सेवा पुरविण्यात सक्षम आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता; तसेच आरोग्याच्या सुविधा चांगल्या प्रमाणात देण्यात येतात. गावात स्थानिक पातळीवर समन्वय आणि एकोप्याचे वातावरण आहे. तसेच आतापर्यंत या गावांपैकी अनेक ग्रामपंचायतींनी निवडणुका बिनविरोध केल्या आहेत. रोहकल, गोनवडी, पिंपरी खुर्द यांसारख्या गावात तर ९९ टक्के लोक हे शेती करतात. या गावांमधील रोजगाराची अकृषक टक्केवारी फक्त १ टक्का आहे. अशा विविध कारणांमुळे नगर परिषदेच्या प्रस्तावित हद्द वाढीत समावेश करू नये, अशा प्रकारचे ठराव या ग्रामपंचायतींनी केले आहेत. प्रस्तावित हद्दवाढ ही १५ ते १६ किलोमीटर असून, या प्रस्तावात सुचविलेल्या काही गावांमध्ये अजिबात शहरीकरण झालेले नाही. ही गावे समाविष्ट करावी म्हणून या गावांमधील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अशी मागणी केलेली नाही, त्यामुळे जनतेची मागणी नसेल तर नगर परिषद या गावांच्या समावेशास उत्साही आणि आग्रही का आहे, असा सवाल पुढे येत असून, या समावेशास आमचा तीव्र विरोध असल्याची स्पष्ट भूमिका या गावातील लोकप्रतिनिधींनी घेतली आहे.आजूबाजूंच्या गावांना विश्वासात घेऊन हद्दवादीचा विचार करावा. येथे नुकतीच नगर परिषद सुरू झाली आहे. आधी कारभार सुरळीत करावा; मगच हद्दवाढीचा विचार करावा. हे तर असे झाले की, मुलगा जन्माला येण्याआधीच लग्नाचा विचार सुरू.- दिलीप मोहिते पाटील,माजी आमदारया ठरावला आमचा तीव्र विरोध आहे. आमच्या उत्पनावर यांचा डोळा आहे. आम्ही आर्थिकदृष्टीने सक्षम आहोत. सर्वसामान्य नागरिकांना नगर परिषद आल्याने मोठी अडचण होईल. तसेच, आमचे गाव आम्ही स्मार्ट व्हिलेज बनविणार आहोत. यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू.- प्रियांका मेदनकरसरपंच-मेदनकरवाडीसंबंधित ग्रामपंचायतींची संमती घेऊन गावे समाविष्ट करावी. सुरुवातीला लगतची गावे घ्यावी आणि मग त्यांचा अनुभव घेऊन पुढे विचार करावा. १३ ते १४ किमी परिसरातील गावे एकाच वेळी समाविष्ट करणे चुकीचे आहे. बाजूची अनेक गावे शेतीप्रधान आहेत.- शरद बुट्टे-पाटील, माजी सभापती, जि.प.अजून आमचे कामही सुरळीत सुरू नाही. निवडणूक होऊन दोनच महिने झाले आहेत. ज्या वाड्या-वस्त्यांचा समावेश करायचा आहे, त्यांना विश्वासात घेऊन समावेशाचा विचार केला पाहिजे.- जीवन सोनवणे, विरोधीपक्ष नेते चाकण नगर परिषदभारतीय जनता पार्टी या ठरावाच्या विरोधात आहे. महाळुंगे गाव हे तीर्थक्षेत्र असल्याने या गावाचा समावेश करू नये, यासाठी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री महोदयांना भेटणार आहे.- दिलीप वाळके,भाजपा तालुकाध्यक्षया ठरावास आमचाही तीव्र विरोध आहे. याविरोधात वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरण्यास आम्ही कमी करणार नाही़- मनोज बोत्रे उपसरपंच, खालुंब्रे