पुणे: आज सकाळी पुण्यातील आंबील ओढा येथे घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी तीव्र विरोध केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होत. पुणे महापालिकेत सत्ताधारी म्हणून भाजप नेत्यांच्या निर्णयाशिवाय कारवाई होत नाही. एवढी मोठं प्रकरण घडत असताना एकही भाजप राजकीय नेता फिरकला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
सकाळी कारवाई सुरु झाल्यावर पोलिस आणि स्थानिकांमध्ये झटापटही पाहायला मिळाली. या कारवाईला आंबिल ओढ्यातील नागरिकांचा विरोध पाहायला मिळत आहे. यावेळी काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला गेला. अशा वेळी पक्षाचे नगरसेवक कुठे गेले होते असं प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेच्या कुठल्याही कारवाईत महापौर जे निर्णय घेतात तेच प्रशासन ऐकत. मीही पुण्याचा माजी महापौर आहे, त्यामुळे मला सर्व माहित आहे. राज्य सरकार किंवा प्रशासनाला दोष न देता, भाजपने हात झटकू नये, आम्ही प्रशासन चालवलं आहे, सत्ताधाऱ्यांना विचारात घेतल्याशिवाय प्रशासनन कारवाई करत नाही, असा दावा राष्ट्रवादीचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडून केला जात आहे.
आम्ही एकाही अधिकाऱ्याला बाहेर पडू देणार नाही. हे सर्व बिल्डरच्या फायद्यासाठी केले जात आहे. असे आम्ही पूर्वीच सांगितले होते. अशा घटनाप्रसंगी नगरसेवकांनी तातडीने येणे गरजेचे आहे. धीरज घाटे सोडून इथे एकही सत्ताधारी नगरसेवक का आला नाही. असा प्रश्न काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
मी कारवाईबाबत आता महापौर आणि आयुक्तांशी बोलतो :- गिरीश बापट
ओढ्याच्या प्रवाहात घरं आहेत त्यांना पर्यायी घरं द्यावी, थोडी लांब असली तरी चालेल, बिल्डरच्या जागेवरही कारवाई सुरु आहे, आधी नोटीस दिली होती, ओढ्यात राहणं योग्य नाही, महापालिकेने पर्यायी व्यवस्था करावी, नियमाप्रमाणे कारवाई होत असताना पुनर्वसनाकडेही दुर्लक्ष करणे योग्य नाही, मी आयुक्तांशी बोलतो, तुम्हाला महापालिका कायमस्वरुपी घर देत असेल तर व्यवस्था होईल, दरवर्षी घरात पाणी शिरणं, घरं वाहून जाणं योग्य नाही.
पाडापाडी महापालिकेच्या वतीने सुरु आहे. त्यांचं पुनर्वसन बिल्डरने केलं ते सुद्धा ओढ्यात केलं. त्यांच्यावरही कारवाई सुरु आहे. चांगल्या जागी पुनर्वसन व्हायला हवी. पर्यायी व्यवस्था महापालिका करत असेल तर सहकार्य करावं असं स्थानिकांना मी सांगितलं आहे, असं गिरीश बापट यांनी सांगितलं. मी आता महापौर आणि आयुक्तांशी बोलून अधिक माहिती घेतो, असं खासदार बापट म्हणाले.