शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

सत्ताधाऱ्यांच्या गोवा दौऱ्यावरून विरोधकांत नाराजी

By admin | Published: June 03, 2017 2:41 AM

एका कंपनीच्या गोव्यातील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या पाहणीसाठी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व आयुक्त यांनी शुक्रवारी केलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : एका कंपनीच्या गोव्यातील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या पाहणीसाठी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व आयुक्त यांनी शुक्रवारी केलेल्या गोवा दौऱ्यावरून विरोधकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पारदर्शकतेची नवी व्याख्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येत असल्याची टीका विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी यावर केली.महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ व आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी गोवा दौरौ केला. एका कंपनीने त्यांचा गोव्यात सुरू असलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प पाहण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांसह सर्वांना बरोबर घेऊन या विषयावर मार्ग काढावा, असे सत्ताधाऱ्यांना सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांची नीती वेगळी दिसते आहे, असे तुपे म्हणाले. प्रत्यक्ष त्यांच्याच पक्षाचे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले हेही त्यांच्यासमवेत नाहीत. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी या दौऱ्याची पुसटशीही कल्पना मला दिलेली नाही. त्यामुळे कोणती कंपनी, कोणी शिफारस केली, त्यांचा प्रकल्प काय आहे, याबाबतही काही माहिती नाही. कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी उरुळी ग्रामस्थांबरोबर चर्चा करून सहकार्य आम्ही विरोधी पक्ष असूनही त्यांना देऊ केले होते, मात्र त्यांनी त्याची जाणीव ठेवलेली दिसत नाही, असे तुपे यांनी सांगितले.