शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

जलयुक्त शिवार योजनेवरील विरोधकांची टिका पोरकट : राम शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 9:48 PM

मदानातून जलसंधारणाची कामे केलेल्या कोट्यावधी नागरिकांच्या हातांचा व त्यांनी गाळलेल्या घामाचा अपमान करणारी आहे, असा आरोप जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केला. 

ठळक मुद्देराज्यात श्रमदानातून झाली असून एकूण ७ हजार ७८९ कोटी रुपयांची कामेयंदा दुष्काळ असूनही जलयुक्त शिवारमुळे ग्रामीण भागात पाणीसाठा उपलब्ध राज्यातील ३५६ तालुक्यांपैकी १०१ तालुक्यांच्या भूजल पातळीत वाढ

पुणे: जलयुक्त शिवार योजनेमुळे कमी पाऊस पडून देखील भूजल पातळी कायम राहण्यात यश आले असून राज्यातील ३५६ तालुक्यांपैकी १०१ तालुक्यांच्या भूजल पातळीत वाढ झाली आहे.भूजल सर्वेक्षण विभागाने (जीएसडीए) ३ हजार ९०० गावांतील सिंचन विहिरींच्या आधारावर सादर केलेल्या अहवालावरून संपूर्ण राज्याचे स्पष्ट होत नाही.त्यामुळे विरोधकांकडून जलयुक्त शिवार योजनेवर केली जाणारी टिका पोरकटपणाची आहे.तसेच श्रमदानातून जलसंधारणाची कामे केलेल्या कोट्यावधी नागरिकांच्या हातांचा व त्यांनी गाळलेल्या घामाचा अपमान करणारी आहे,असा आरोप जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सोमवारी केला. राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला.मात्र,त्यातून राज्याच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही; या उलट पाणी पातळीत घट झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केली जात आहे.त्यावर राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेवून जलयुक्त शिवार योजनेमुळे वाढलेल्या भूजल पातळीबाबत माहिती दिली.शिंदे म्हणाले,जलयुक्त शिवार योजना लोकांनी स्वाकारली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.तब्बल ७०० कोटी रुपयांची कामे श्रमदानातून झाली असून राज्यात एकूण ७ हजार ७८९ कोटी रुपयांची कामे झाली आहेत.मराठवाड्यासारख्या भागातही गेल्यावर्षापर्यंत  ४.५ मिटरने भूजल पातळी वाढली होती.राज्यातील सोयाबीनच्या उत्पादकतेत ११.५१ टक्के,मूग पिकात १.१८ टक्के, उडिद पिकात २ टक्के आणि बाजरीच्या पिकात ८ टक्के वाढ दिसून येत आहे.हे जलयुक्त शिवार योजनेचे यश आहे,असे स्पष्ट करून शिंदे म्हणाले, २०१७-१८ वर्षात अघवा ८४ टक्के पाऊस झालेला असताना १८० लाख मेट्रिक टन उत्पादन झाले होते.तर २०१३-१४ मध्ये १२४ टक्के पाऊस पडूनही केवळ १३८ लाख मेंट्रिक टन उत्पादन घेता आले होते.त्याचप्रमाणे यंदा दुष्काळ असूनही जलयुक्त शिवारमुळे ग्रामीण भागात पाणीसाठा उपलब्ध असल्याने आॅक्टोबर महिन्यात वीजेची मागणी २९ टक्क्यांनी वाढली असल्याचे महावितरणकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.----------------जलयुक्त शिवारची कामे झालेल्या गावातच पाणी पातळीत घट झाली असल्याचा विरोधांकडून केला जाणारा आरोप धादांत खोटा असून राज्यात ५ लाख ४२ हजार कामे झाली आहेत.त्यामुळे राज्याची पिक उत्पादनात ४५ टक्के वाढ झाली आहे.तसेच टँकरच्या संख्येत घट झाली असून सध्या राज्यात केवळ १ हजार ४५ टँकर सुरू आहेत.जलयुक्तची कामे झाली त्या ठिकाणचे शेतकरी समाधानी आहेत,असेही राम शिंदे म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रRam Shindeप्रा. राम शिंदेJalyukt Shivarजलयुक्त शिवारGovernmentसरकार