शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

पुणे विद्यापीठातर्फे प्रथम,द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एमसीक्यू परीक्षांचा पर्याय; अद्याप अंतिम निर्णय नाही  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 9:17 PM

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीमुळे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या.

ठळक मुद्देपुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमधील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कल्पना

पुणे: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातर्फे विविध पर्यायांचा विचार केला जात असून त्याबाबत  पुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमधील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कल्पना देण्यात आली आहे. लोकडाऊन संपल्यानंतर बहूपयार्यी प्रश्न (एमसीक्यू ) देऊन परीक्षा घेण्यासह इतर काही पर्याय पुढे आले आहेत. मात्र, त्यावर अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीमुळे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या.परंतु, लोकडाऊन व जमावबंदी हटवल्यानंतर परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व कुलगुरूंची ऑनलाईन पध्दतीने बैठक घेतली होती. तसेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सुध्दा कुलगुरूंची बैठक घेऊन एक समिती स्थापन केली.या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी सुमारे 550 प्राचार्यांशी ऑनलाईन पध्दतीने चर्चा केली. त्यात परीक्षांचे स्वरूप बदलण्याबाबत प्राचार्यांची मते जाणून घेतली.त्यात प्रथम व द्वितीय वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा एमसीक्यू प्रश्न देऊन घ्याव्यात.परंतु,तृतीय वर्षाच्या परीक्षा पूर्वीच्या आहे त्याच पध्दतीने घ्यावात, असे मत काही प्राचार्यांनी मांडले. त्यामुळे परीक्षेचे स्वरूप बदलणार असले तरी ते कसे असेल;याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही,असे या चर्चेतून समोर आले.-----विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी ऑनलाईन पध्दतीने घेतलेल्या बैठकीत माझ्या सह अनेक प्राचार्यांनी सहभाग घेतला. त्यात प्रात्यक्षिक परीक्षा महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राध्यापकाच्या नियंत्रणाखाली घेण्याबाबत भूमिका मांडण्यात आली. विद्यार्थ्यांना होम असाईन्मेंट देण्यात याव्यात. तसेच त्यातही 25 टक्के इंटरनल व 25 टक्के एक्सटर्नल याचा विचार करावा. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मानसिक आधाराची गरज असून त्यावरही उपाय करणे गरजेचे असल्याचे या बैठकीतून समोर आले. - डॉ.दिलीप शेठ, प्राचार्य, स.प.महाविद्यालय ----- 

सर्वच विद्यार्थ्यांच्या नेहमी सारख्या परीक्षा घेऊन त्यांचा निकाल लावणे शक्य नाही. त्यामुळे केवळ तृतीय वर्षाच्या व पदव्युत्तर पदवीच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा नेहमी प्रमाणे घ्याव्यात इतर परीक्षांच्या स्वरूपात बदल करावा, अशी चर्चा या बैठकीत झाली.परंतु, लॉकडाऊन केव्हा उठविला जाणार यावरच परीक्षा कशा घ्याव्यात हे होईल. त्यामुळे परीक्षांबाबत केवळ चर्चा झाली.अद्याप अंतिम निर्णय झाला नाही.- डॉ.व्ही.गायकवाड, प्राचार्य, के.टी.एच.एम.महाविद्यालय, नाशिक 

------विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी प्राचार्यांशी संवाद साधून परीक्षा कोणत्या पध्दतीने घेता येईल, याचा आढावा घेतला. लॉकडाऊन केव्हा उठविणार त्यानंतर परीक्षा घेता येईल, या बाबतचे चित्र स्पष्ट होईल. - डॉ.के.सी.मोहिते,प्राचार्य, सी.टी.बोरा कॉलेज, शिरूर

...............................................................

* विद्यापीठाचे निवेदन.....

सध्याच्या लाँक डाऊनच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा कशा प्रकारे घेता येतील याबाबत चर्चा करण्यासाठी मा. कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थांचे संचालक, विविध अभ्यास मंडळांचे सदस्य यांच्याशी गुरूवार व शुक्रवारी माध्यमातून चर्चा केली.या चचेर्चा उद्देश, परीक्षांबाबत विविध शक्यता समजून घेणे हा होता. याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. विद्यापीठाच्या परीक्षांबाबतचा निर्णय हा शासनाच्या निर्णयानुसारच असेल.

मात्र, या बैठकीतील चचेर्चा काही भाग काही जणांकडून रेकाँर्ड करणात आला. तो समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये. विद्यापीठ शासनाच्या निर्णयानुसार परीक्षांबाबत निर्णय घेईल.

* यासंबंधी मा. कुलगुरू हे कोणाच्याही फेसबुक पेजद्वारे किंवा तत्सम सोशल मीडियाद्वारे संवाद साधणार नाहीत. यासंबंधीचा निर्णय विद्यापीठाच्या अधिकृत निवेदनाद्वारेच जाहीर केला जाईल.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठnitin karmalkarनितीन करमळकरStudentविद्यार्थीexamपरीक्षाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस