पुणे : निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असतानाही अपंग कल्याण निधी अंतर्गत २०१६-१७ मधील असणारा अखर्चित निधी मुदतीपूर्वीच जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा आदेश दिला आहे, तो निर्णय चुकीचा आहे, असा आरोप प्रहार अपंग क्रांती संघटनेने केला आहे. हा निर्णय त्वरित बदलावा; अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव व पुणे जिल्हाध्यक्षा सुरेखा ढवळे दिला आहे़सन २०१६-१७ मधील निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असते. मात्र चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार केला आहे़ याचा फटका जिल्ह्यातील अपंगांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपंग त्यांच्या हक्कांपासून वंचित राहत आहेत़ तरी आपण हे परिपत्रक तत्काळ रद्द करावे. तीन टक्के निधी खर्च केल्याबाबतची माहिती कार्यालयात नसताना चुकीचे पत्र काढणे योग्य नाही, असेही संघटनेने जिल्हा परिषदेला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे़ जिल्हा परिषदेप्रमाणे पंचायत समित्या व ग्रामपंचायतींनी त्यांच्या उत्पन्नाच्या तीन टक्के निधी अपंगांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे़ असे असतानाही उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सन २०१६-१७ मधील अपंग कल्याण निधी अखर्चित निधी वर्ष वर्षभरात संपत नसेल तर जि. प. च्या खात्यात जमा करण्यास कळविले आहे.समाजकल्याण विभागाकडून सूचना मागवणार.२१ सप्टेंबर २०१६ रोजी शासनाने अपंग कल्याण निधी खर्च न झाल्यास जिल्हा परिषदेकडे वर्ग करावा, असे परिपत्रक काढले आहे. त्याचीच अंमलबजावणी करण्यात आली आहे़ मात्र तरीही याबाबत समाजकल्याण आयुक्तांकडून मार्गदर्शक सूचना मागविण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले.
मुदतीपूर्वीच अखर्चित निधी वर्गचा आदेश; प्रहार अपंग क्रांती संघटनेचा तीव्र विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 1:38 PM
निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असतानाही अपंग कल्याण निधी अंतर्गत २०१६-१७ मधील असणारा अखर्चित निधी मुदतीपूर्वीच जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा आदेश दिला आहे, तो निर्णय चुकीचा आहे, असा आरोप प्रहार अपंग क्रांती संघटनेने केला आहे.
ठळक मुद्देनिर्णय त्वरित बदलावा; अन्यथा तीव्र आंदोलन करणार : प्रहार अपंग क्रांती संघटनासमाजकल्याण आयुक्तांकडून मार्गदर्शक सूचना मागविण्यात येणार : संदीप कोहिनकर